विवाहबाह्य संबंधांमुळे होणारे नुकसान

विवाहबाह्य संबंधांमुळे होणारे नुकसान

चंदा मांडवकर :

विवाहबाह्य संबंधांबद्दल समाजात नेहमीच धीम्या आवाजात बोलले जाते. परंतु बहुतांश लोकांना हे कळत नाही की, सामाजिक प्रतिष्ठेवर याचा मोठा परिणाम होतोच. पण त्याचसोबत मानसिक आणि शारिरीक रुपात ही व्यक्तीला ते प्रभावित करते. खरं बोलायचे झाल्यास, विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात कटुता येते आणि त्याचे दुष्परिणाम फार भयंकर होतात.

एक व्यक्ती आपल्या पार्टनरला फसवत असल्यामागील काही कारणं असू शकतात. विवाहबाह्य संबंध हे तेव्हापासून आहेत जेव्हापासून लग्नाची प्रथा सुरु झाली. परंतु आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवयाचे आहे की, पार्टनरला फसवणे आपण आपल्यासह दोन परिवारांमध्ये फूट पाडणे.

परंतु विवाहबाह्य संबंध करण्यामागे कधीकधी आपलेपणाच्या भावनेची कमतरता, दीर्घकाळ पार्टनर सोबत सेक्स न करणे, एकटेपण वाटणे किंवा वारंवार पार्टनर सोबत होणारे वाद या सर्वांना कंटाळणे अशी काही कारणं असू शकतात. परिणामी यामुळे विवाहबाह्य संबंध समाजात वाढली जातात. पण याचे काही नुकसान ही आहेत. जसे कीविवाहबाह्य संबंध बद्दल गुप्तता, काही सिक्रेट्स आणि पडकले गेलो तर भीती. जेव्हा असे दीर्घकाळ सुरु राहते तेव्हा व्यक्तीला वारंवार भीती वाटते राहते की, तो यापासून बचावेल की नाही.

अपराधीपणाची भावना

एखादा आपल्या पार्टनर सोबत खुश राहू शकतो. जर नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा असेल. मात्र नात्याच नेहमीच एकावरच प्रत्येक गोष्टीसाठी बोट दाखवले जात असेल तर समोरचा व्यक्ती याला कालांतराने कंटाळतो. अशातच विवाहबाह्य संबंध झाले तर आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला आपण फसवल्याची अपराधीपणाची भावना मनात कुठे ना कुठे तरी निर्माण होते. यामुळे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होतो, व्यक्ती खचला जातो. त्याचसोबत व्यक्तीची अधिक चिडचिड आणि मानसिक ताण ही वाढतो.

पडकले जाण्याची भीती

आपण ऐकते भीती ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहे अशातच विवाहबाह्य संबंधांमध्ये आपण जर पडकले गेलो तर काय होईल याची भीती सतत मनात असते. यामुळे आपल्याबद्दल परिवार, समाज काय विचार करेल याचा अधिकाधिक विचार डोक्यात येत राहतो ही गोष्ट व्यक्तीला मानसिक आणि भावनात्मक अस्थिरता निर्माण करण्यास भाग पाडते. त्यामुळे त्याला अधिक चिंता आणि असंवेदनशीलता वाटत राहते.

मानसिक थकवा

भीती ही अपराधाची भावना कोणालाही मानसिक थकवा देऊ शकतो. या व्यतिरिक्त पार्टनरकडून असलेल्या काही अपेक्षा ही नकोशा वाटतात, याचा सर्वपणे मानसिक आरोग्यावर अधिक ताण पडल्याने थकवा येतो. काय नक्की करावे हे सुचत नाही. त्याचसोबत एकाच वेळी दोन लोकांसोबत रोमॅन्टिक रुपात जोडले जाणे हे वास्तवात खुप आव्हानात्मक असते.

आत्मसन्मानाला ठेच पोहचते

विवाहबाह्य संबंध बद्दलची गुंतागुंत सोडवण्यादरम्यान मानसिक आरोग्य अधिक बिघडले जाते. समोरच्या व्यक्तीला गुन्हेगाराच्या भावनेने पाहिले जाते आणि कधीकधी व्यक्ती स्वतः ला दोषी मानते. यामुळे आत्मसन्मानाला ठेच पोहचली जाते. या संबंधामुळे लज्जा, भीती अशा भावना मनात निर्माण होतात. एकाच वेळी दोन आयुष्य जगताना मानसिक असंतोष, थकवा आणि मत्सर निर्माण होऊ शकतो.

या व्यतिरिक्त विवाहबाह्य संबंधांमुळे पार्टनर सोबतचे रिलेशनशिप हे आधीसारखे राहत नाही. एकमेकांपासून दूरावा निर्माण होतो आणि अशातच नाते तुटले जाते.


हेही वाचा :

ब्युटी आणि सेक्सचे कनेकश्न काय?

First Published on: February 10, 2023 3:20 PM
Exit mobile version