आय फ्लूपासून बचावासाठी डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

आय फ्लूपासून बचावासाठी डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

देशभरात कंजेक्टिवाइटिस म्हणजेच आय फ्लू ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या आजारात डोळे लाल होणे, दुखणे आणि डोळ्यांमधून चिकट पदार्थ बाहेर पडणे अशी काही लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यात आय फ्लू चा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते आय फ्लू व्हायरल, बॅक्टेरियल किंवा एलर्जीक संक्रमणाचे कारण असू शकते. अशातच डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. आय फ्लू पासून बचाव करायचा असेल तर पुढील काही फूड्स तुम्ही खाऊ शकता. (eye flu care)

हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या डोळ्यांचे आरोग्य राखण्यास फार फायदेशीर मानल्या जातात. यामुळे आपल्या डाएटमध्ये पालक, ल्यूटीन सारख्या भाज्यांचा समावेश करु शकता. यामध्ये अँन्टीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जे डोळ्यांच्या समस्येपासून तुम्हाला दूर ठेवतात.

व्हिटॅमिन-ए युक्त फळं आणि भाज्या
डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-ए ची आवश्यकता असते. शरिरात याची पुर्तता करण्यासाठी तुम्ही आपल्या डाएटमध्ये गाजर, पपई, भोपळा यांचा समावेश करू शकता. यामध्ये बीटा कॅरेटीन उत्तम प्रमाणात असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फार महत्त्वपूर्ण असतात.

व्हिटॅमिन-सी
व्हिटॅमिन-सी डोळ्यांच्या संसर्गापासून तुम्हाला दूर ठेवते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे तुम्ही काही आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून दूर राहू शकता.

अंडी खा
अंड्यामध्ये प्रोटीन पुरेश्या प्रमाणात असते. या व्यतिरिक्त त्यात झिंक आणि अँन्टीऑक्सिडेंट उत्तम प्रमाणात असतात. जर तुम्ही दररोज तुमच्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश केला तर डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.

नट्स
नट्समध्ये व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात मिळते. जे तुमच्या डोळ्यांना फ्री रेडिकल्सपासून बचाव करते. यासाठी तुम्ही बदाम, अक्रोड खाऊ शकता.


हेही वाचा- Nose Congestion-पावसाळ्यात वारंवार सर्दी होतेय, नाकं चोंदलय , मग करा हे उपाय

First Published on: August 8, 2023 11:36 AM
Exit mobile version