फॅशन ‘काउल’ पॅटर्नची

फॅशन ‘काउल’ पॅटर्नची

फॅशन ‘काउल’ पॅटर्नची

‘काउल’ हा शब्द आणि पोशाख (ड्रेस) यांच्याबाबतीत काही सांगण्याची गरज नाही. पण आता फॅशनच्या जगात हा हॉट ट्रेंड बनला आहे. काउल पँटस, काउल नेक टॉप, काउल ड्रेस किंवा काउल इव्हिनिंग गाऊन्स तरुणींमध्ये लोकप्रिय होत आहे.

काउल हे पूर्वीच्या काळात संत किंवा फकिर लोकं धारण करायचे. हा ड्रेस डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणारा आहे. यात कमरेवर एक दोरी बांधण्यात येते. त्यामुळे तो विभागला जातो. या ड्रेसचे एक अजून वैशिष्ठ्य म्हणजे कपड्यांच्या घड्या एकावर एक येऊन एखाद्या माळेसारख्या मानेला झाकून घेतात. आता काउल पँटसही बाजारात आल्या आहेत. धोतरासारख्या या काउल पँटला शॉर्ट-लाँग कुर्ते, टॉप आणि टी शर्ट सोबत घालता येते. सलवारसारख्या दिसणार्‍या काउल पँट आरामदायी असतात.

काउल डिझाईनबरोबरच याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हूड. पण प्रत्येक काउलमध्ये हूड असेलच, असे नाही. जुन्या काळातील लोक जेव्हा याला धारण करत होते तेव्हा हुड असायचे. हल्ली हुडाचा वापर स्वेटरसोबत होतो. हा ड्रेस आरामदायक आहे. तो तयार करण्यासाठी कॉटन, सिल्क, मलमल आणि सिंथेटिक मटेरियल्सचा वापर करण्यात येतो.

मरीन ब्ल्यू, लाइट यलो, कूल ग्रीन आणि व्हाईट रंगांचे हे ड्रेस आकर्षक दिसतात. या ड्रेसला खास करून पार्टीत, कॉलेज किंवा गेट टू गेदरमध्ये घालू शकता. तुम्ही याला ट्रेडिशनल आणि मॉर्डन दोन्ही प्रकारचे लूक देऊ शकता. त्यासाठी थोडेसे क्रिएटिव्ह होण्याची गरज आहे. तर मग आता थोडे वेगळ्या पण नवीन डिझाईनमध्ये काउलचा वापर करूया!

First Published on: October 28, 2018 3:49 AM
Exit mobile version