Wednesday, May 8, 2024
घरमानिनीHealthWorkout Tips : वर्कआऊट करताना गरगरत, चक्कर येतेय?.. मग वाचा

Workout Tips : वर्कआऊट करताना गरगरत, चक्कर येतेय?.. मग वाचा

Subscribe

वर्कआऊट करताना, चक्कर आल्यास, पडल्या सारखे वाटल्यास किंवा नंतर काही डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास त्या कारणाकडे दुर्लक्ष करू नका.

चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हि एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं.पण वर्कआऊट करताना, चक्कर आल्यास, पडल्या सारखे वाटल्यास किंवा नंतर काही डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास त्या कारणाकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तसेच workout करताना सगळे जण कोणत्या ना कोणत्या कामातून आलेले असतात. अशातच प्रत्येकाच्या बॉडीची स्थिती हि वेगळी असते. अशातच बॉडीची कशी काळजी घेता येईल या कडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.

- Advertisement -

Bad Workout Habits That Experts Say Can Cause Injury

workout करताना ‘या’ टिप्स करा फॉलो-

- Advertisement -
  • workout करतानानेहमी पेक्षा जास्त घाम येत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे पाणी आवश्यक पेक्षा जास्त प्या.
  • तसेच श्वास घेताना त्रास होत असेल आणि घसा कोरडा होत असेल तर व्यायामानंतर लगेच कोणती धावपळ करू नका. कारण यावेळी ब्लड प्रेशर हे हाय असते.
  • महत्वाचे म्हणजे रक्तातील साखर कमीझाल्यामुळे लवकर दम लागतो.
  • यामुळे व्यायाम करताना शरीराला पोषक तत्वांची गरज असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होणार नाही.
  • यासाठी फळे,कडधान्य,ड्रायफ्रुटसची गरज शरीराला असते. यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश करा.ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
  • तसेच हे खाल्ल्याने व्यायाम करताना चक्कर येत नाही.
  • ज्या व्यक्तींचा रक्तदाब कमी त्यांनी जर अशावेळी workout केले तर त्यांना चक्कर येऊ शकते.
  • अशावेळी तुमचा रक्तदाब कमी किंवा जास्त असल्यास, तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • फिटनेस तज्ञाच्या मदतीनेच व्यायाम करा.
  • यासोबतच असे व्यायाम प्रकार करू नका, ज्यासाठी जास्त शारीरिक श्रम करावे लागतील.
  • उन्हाळ्याच्या दिवसात जास्त workout करू नये. कारण बॉडी मधून पाणी बाहेर पडत असते.
  • त्यामुळे नैसर्गिकरित्या घामावाटे पण जात असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते.

हेही वाचा :

मसल्स आणि मूड दोघांसाठी बेस्ट आहे Music workout

- Advertisment -

Manini