‘बटाट्याचे’ ५ सौंदयवर्धक फायदे!

‘बटाट्याचे’ ५ सौंदयवर्धक फायदे!

(फोटो प्रातिनिधिक आहे)

आपल्या स्वयंपाकघरामध्ये बटाटा नेहमीच आढळून येतो. मात्र हा बटाटा तेवढ्यापुरता मर्यादित नसून त्याचा सौंदर्याकरता देखील वापर होऊ शकतो. बटाटा हा नैसर्गिकरित्या चेहरा उजळवतो. चला तर जाणून घेऊया बटाट्याच्या सौंदयवर्धक टीप्स!

चेहऱ्यावरील काळे डाग

चेहऱ्यावर काळे डाग असल्यास बटाट्याचा वापर करावा. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस काढून त्याने चेहऱ्यावर मसाज करावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे

डोळ्याखालील काळी वर्तुळे सौंदर्यामध्ये बाधा आणतात. ही डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याच्या चकत्या काढून डोळ्यावर ठेवाव्यात. यामुळे ही काळी वर्तुळे कमी होतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या

काही तरुण – तरुणींच्या चेहऱ्यावर वयस्कर व्यक्तीसारख्या सुरकुत्या दिसतात. त्या दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात कापूस बुडवून तो कापूस फ्रिजमध्ये ठेऊन तो चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिकरित्या ब्लीच

बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावावा आणि हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे नैसर्गिकरित्या ब्लीच होऊन चेहरा उजळ दिसतो.

चेहरा स्वच्छ होतो

बटाट्याचा एक चमचा रस, दोन चमचे लिंबू रस आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करुन हा तयार फेसपॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. तसेच चेहरा उजळण्यास मदत होते.

First Published on: July 31, 2018 6:17 PM
Exit mobile version