Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthन्यूजपेपरवर ठेवून पदार्थ खाणे ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

न्यूजपेपरवर ठेवून पदार्थ खाणे ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

Subscribe

जुन्या काळापासून ते आतापर्यंत न्यूजपेपरची एक वेगळीच क्रेज आहे. लोक आज सुद्धा जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी इंग्रजी, मराठी अशा विविध भाषांमधील न्यूजपेपर वाचतात. मात्र असे सुद्धा पाहिले गेले आहे की, न्यूजपेपर हा विविध कामांसाठी वापरला जातो. बहुतांश दुकानांमध्ये न्यूजपेपर हा खाण्यापिण्याच्या गोष्टी बांधून देण्यासाठी केला जातो.

ऐवढेच नव्हे तर काही गरीब लोक भांडी नसल्याने न्यूजपेपरचा वापर करून त्यात जेवण जेवतात. गावात अद्याप ही खाण्याचे पदार्थ न्यूजपेपरमध्ये बांधून दिले जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, न्यूजपेपरमध्ये बांधून दिलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

- Advertisement -

Food safety authority urges vendors to stop using newspapers - NewsBharati

छपाईच्या शाईमुळे होईल नुकसान
न्यूजपेपरसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये केमिकल असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा न्यूजपेपरवर पदार्थ ठेवून खाता तेव्हा त्यात त्याची शाई मिक्स होऊन तुमच्या पोटात जाते. जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा प्रकारे तुमच्या शरीराला गंभीर समस्या उद्भवू शकते.

- Advertisement -

पोटासंबंधित समस्या
जर पेपरवर ठेवून तुम्ही खात असाल तर कालांतराने तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवू शकते. तुम्हाला हे कळले पाहिजे की, वाचण्यासाठी येणारा न्यूजपेपर हा खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाऊ नयेत. अन्यथा अपचन, गॅस आणि अन्य पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.


हेही वाचा- ओव्हरईटींगची ‘ही’ आहेत कारणे

- Advertisment -

Manini