Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthG-Spot म्हणजे काय?

G-Spot म्हणजे काय?

Subscribe

महिलांना सेक्स करण्याची इच्छा होते का? महिलांना यामध्ये पुरुषांपेक्षा अधिक आनंद मिळतो का? या सारखे काही प्रश्न पुरुषांना आजही पडतात. याच संदर्भाला एक रिपोर्ट ही समोर आला होता. त्यात असे सांगितले गेलेयं की, ५१ टक्के पुरुषांना महिलांचा सेक्शुअल प्लेजर स्पॉट म्हणजेच जी स्पॉट बद्दल माहिती नसते. चला तर आजच्या या व्हिडिओत आपण जी स्पॉट म्हणजे नक्की काय याच बद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

महिलांमध्ये ऑर्गेझम हे पुरुषांपेक्षा कईक पटींनी वेगळे असते. पुरुषांना जेव्हा कामोत्तेजनाची चिन्ह दिसतात तेव्हा त्यांच्यात वीर्यपतन होते. परंतु महिलांचे तसे होत नाही. महिलांना हे सुख मिळते पण त्यांच्या भावनांमधून. काही महिला अशा आहेत ज्यांना एकाच वेळी मल्टिपल ऑर्गेझमचा अनुभव येतो.

- Advertisement -
Photo Credits- Google
Photo Credits- Google

आता, जी स्पॉट म्हणजे नक्की काय असा प्रश्न तु्म्हाला पडला असेल. खरंतर महिलांच्या जी स्पॉटचा उल्लेख पहिल्यांदाच जर्मनमधील स्रीरोगतज्ञ अर्न्स्ट ग्रॅफेनबर्ग यांनी केला होता. पण त्यावेळी जी स्पॉटबद्दल आरोग्यतज्ञांमध्ये मतभेद झाले. त्यापैकी काहींनी असे म्हटले महिलांना जी स्पॉट नसतो.

पण तुम्हाला माहितेय का, महिलांच्या योनीच्या वरच्या भागात एक स्पॉट असतो. त्यामुळे स्रिया उत्तेजित होतात. काही तज्ञ असे म्हणतात की, या स्पॉटवर उत्तेजना ही ऑर्गेझमच्या वेळी वेगळा अनुभव देते.

- Advertisment -

Manini