Monday, April 29, 2024
घरमानिनीWomen Handbag : नवी कोरी बॅग पेपरनी का भरलेली असते?

Women Handbag : नवी कोरी बॅग पेपरनी का भरलेली असते?

Subscribe

महिलांच्या सतत सोबत असणाऱ्या बॅगेला त्यांची मैत्रीण म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. महिलांची जिवाभावाची असणारी अशी ही बॅग जेव्हा आपण बाजारातून खरेदी करून घरी आणतो तेव्हा ती कायम पेपरनी अर्थात वर्तमानपत्रांनी भरलेली असते. तुम्ही जेव्हा ती घरी ऑनलाइन पद्धतीने मागवता तेव्हा सुद्धा तशीच परिस्थिती असते. बॅगेतील पेपर आपण कचऱ्यात टाकून देतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की , नव्या कोऱ्या बॅगेत पेपर का असतात. या बॅगेत पेपर भरल्याने दुकानदाराला काय फायदा होतो.

पेपर टाकल्याने बॅगेचे नुकसान टाळले जाते, रस्ताही नव्या कोऱ्या बॅगेत पेपर टाकले जातात.

- Advertisement -

नव्या बॅगेत पेपर टाकल्याने काय होते? 

नव्या बॅगेत पेपर ठेवल्याने बॅग योग्य आकारात राहते. अनेकदा दुकानात येण्याआधी पॅकिंग असल्याने बॅग एकावर एक दाबल्या जातात, अशावेळी त्याचा आकार बदलण्याची अधिक शक्यता असते.

बॅगेचा आकरा बदलल्यास बॅग फाटण्याची सुद्धा शक्यता असते. तसेच त्यात वापरण्यात आलेल्या चैन तुटू शकते. यासाठी बॅगेची क्वालिटी टिकून ठेवण्यासाठी बॅगेमध्ये पेपर भरली जातात.

- Advertisement -

नव्या बॅगेत पेपर टाकण्याचे आणखी एक कारण म्हणजे ग्राहकांपर्यंत तिची डिझाईन आणि त्याच आकारात ग्राहकांपर्यत पोहिचवणे कारण बॅगेचा आकार बदलल्यास मालकांचे दोघांचेही नुकसान होण्याहची शक्यता असते.

काही वेळा नवीन बॅगेचा आत ओलावा तयार होतो आणि ओलाव्यामुळे दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे दुर्गंधी टाळण्यासाठी आणि बॅगेत ओलावा निर्माण होऊ नये यासाठी बॅगेत पेपर ठेवले जातात.

पेपर टाकल्याने जर नवीन बॅगेत थोडा जरी ओलसर किंवा दमटपणा असेल तो तो कागद ठेवल्याने शोषला जातो आई पेपर सूकतोही, त्यामुळे नवीन बॅगेत पेपर ठेवले जातात.

 

 


हेही पहा : एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी या टिप्स

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini