या उपायांनी मिळवा गॅसपासून सुटका

या उपायांनी मिळवा गॅसपासून सुटका

Indigestion

पोटात गॅस झाल्यावर जेवणात मूग, चणा, मटार, बटाटे, तांदूळ किंवा मसालेयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करु नये. पालेभाज्या, खिचडी, पोळी, दूध, पालक आदी सहज पचणार्‍या अन्नाचे सेवन करावे. स्ट्रेस, भीती, चिंता, राग यामुळे डायजेशन पार्ट्सच्या आवश्यक पाचक रसांचा स्त्राव कमी होतो. ज्यामुळे अपचनाची समस्या होते आणि अपचनामुळे पोटात गॅस निर्माण होतो.

जेवण चावून खा

जेवण चावून आरामात खा. जेवताना पाणी सेवन करु नका. भोजनाच्या 1 तासानंतर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. दोन्ही वेळेच्या जेवणामध्ये हलका नाष्टा किंवा फळे अवश्य खा.

ऑयली फूड

ऑयली आणि मसालेदार अन्न खाऊ नका. भोजन साधे आणि सात्विक असले पाहिजे.

लिंबूचा रस

लिंबूचा रस घेतल्याने गॅसची समस्या होत नाही आणि डायजेशन योग्य राहते. जेवणानंतर तुम्ही जेव्हा पाणी प्याल तेव्हा त्यामध्ये अर्धाच चमचा लिंबू पिळून प्या.

पाणी

दिवसभर 8-10 ग्लास पाणी अवश्य प्या. पाणी बॉडीच्या टॉक्सिक दूर करण्यासोबतच डायजेशन योग्य ठेवते.

एक्सरसाइज

रोज कोणती ना कोणती एक्सरसाइज करण्याची सवय ठेवा. संध्याकाळी फिरायला जा. व्यायाम केल्याने फायदा मिळतो. प्राणायाम केल्याने पोटातील गॅसची समस्या दूर होते.

सवय बदला

दिवसा झोपण्याची सवय मोडा आणि रात्री जागू नका. रात्री उशिरापर्यंत जागून कॉफी किंवा चहा पित राहिल्याने पोटात समस्या होते.

मादक पदार्थ

अल्कोहोल, चहा, कॉफी, तंबाखू, गुटखासारख्या मादक पदार्थांपासून दूर राहा. हे खात राहिल्याने भूकेला अवॉएड केले जाते त्यामुळे उपाशीपोटी गॅस निर्माण होतो.

गॅस दूर करण्याच्या सोप्या पध्दती

जेवणानंतर एक चमचा ओव्यासोबत चिमूटभर काळे मीठ खाल्ल्याने गॅस तात्काळ निघून जातात.
जेवणानंतर एकएक चमचा अदरक आणि लिंबूच्या रसामध्ये थोडे मीठ मिळवून जेवणानंतर सेवन केल्याने गॅसपासून आराम मिळतो.जेवणाच्या वेळी मध्ये-मध्ये लसूण, हिंग, थोड्या थोड्या प्रमाणात खाल्ल्याने गॅसचा त्रास होत नाही.

First Published on: November 3, 2018 12:00 AM
Exit mobile version