Goa Tourism: ऑफबीट गोव्यातील ही ५ बेटे तुम्हाला माहिती आहेत का?

Goa Tourism: ऑफबीट गोव्यातील ही ५ बेटे तुम्हाला माहिती आहेत का?

Goa Tourism: ऑफबीट गोव्यातील ही ५ बेटे तुम्हाला माहिती आहेत का?

सुट्ट्यांसाठी, हनिमूनसाठी फिरायला कुठे जायच असा प्रश्न कोणी विचारला की डोळ्यांसमोर येऊन राहत ते म्हणजे गोवा. नजर जाईल तिथवर दूरवर पसरलेला समुद्र, अनेक ऐतिहासिक वास्तू, गोव्याची खाद्यसंस्कृती, तिथले लोक, तिथल्या परंपरा, गोव्यातील चर्च, गोव्याची वाईन, हिंदू कॅथलिक लोकांचे दोन्ही धर्मांवर असलेले प्रेम हे सगळ गोव्याला गेल्यावर पहायला मिळत. इंग्रज आणि पोर्तुगिजांचे गोव्यावर अनेक वर्ष वास्तव्य असल्याने गोव्याच्या संस्कृतीतील तिथल्या राहणीमाणावर याचा परिणाम दिसतो.

गोव्यात गेल्यावर जुना गोवा, गोवा बीच, अंजुना, आरांबोल, अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. गोव्यात गेल्यावर या ठिकाणांवर लोक हमखास जातातच. मात्र गोव्यातील अशी काही ठिकाणं आहेत जी बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. गोव्यात ऑफ बीट बीचेस कदाचित अनेकांना माहिती असतील मात्र आज जाणून घेऊयात गोव्यातील ५ ऑफबीट बेटे.

दीवार बेट

पणजीपासून १० किलोमीटर हे बेट वसलेले आहे. या बेटावर फक्त फेरी बोट उपलब्ध आहेत. इतक कोणताही रस्ता या ठिकाणी जात नाही. नारोआ, पायदेडे आणि मलार अशी तीन गाव या बेटावर आहेत. पर्यटकांसाठी इथल्या गावातील लोकांनी खास व्यवस्था केली आहे

चोराव बेट

गोव्यात जाऊन छान रिलॅक्स व्हायचं असेल तर त्यासाठीच एक सुंदर आणि शांत ठिकाण म्हणजे चोराव बेट. हे बेट पणजीपासून फार जवळ म्हणजेच अवघ्या ५ किलोमीटर आहे. राय बंदरापासून तुम्हाला चोरावला जाण्यासाठी एक फेरी पाँईट म्हणजेच फेरी बोट उपलब्ध आहे.

फुलपाखरु बेट

या बेटाचे नाव आहे बटरफ्लाय बेट किंवा फुलपाखरू बेट असे आहे. बेटाच्या आकार अगदी हुबेहुब फुलपाखरासारखा असल्याने त्याचे नाव फुलपाखरू बेट असे ठेवले आहे. या बेटाला हनीमून बेट असे देखील म्हणतात.

साओ जॅसिंटो बेट

गोव्यात असलेल्या जुन्या चर्चची माहिती काढली तर गोव्यात सेंट जॅसिंटो नावाचे एक चर्च आहे. या चर्चच्या नावावरुनच या बेटाचे नाव साओ जॅसिंटो असे ठेवले आहे. साओ बेट हे निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर निर्मिती आहे.

कॉन्को बेट

गोव्यातील पर्यटन हे परदेशी पाहुण्यांना सर्वात जास्त आकर्षित करते. ऑफबिट गोव्यातील हे ठिकाण म्हणजेच कॉन्को बेट परदेशी पर्यकांना प्रामुख्याने आकर्षित करते. पर्यटकांच्या मनाला भीडणारे हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. गोव्यात कॅनाकोना प्रेदशातील पालोलेम समुद्राच्या एका खाडीवर हे कॉन्को बेट वसलेले आहे.


हेही वाचा – Kitchen Hacks: हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू; कॅन्सर, हार्टच्या आजारापासून रहा दूर

First Published on: November 18, 2021 6:38 PM
Exit mobile version