चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी,चॉकलेट खा आणि वजन कमी करा

चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी,चॉकलेट खा आणि वजन कमी करा

चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी,चॉकलेट खा आणि वजन कमी करा

जगभरात असा क्वचितच व्यक्ती सापडेल की ज्याला चॉकलेट पसंत नाही. वयोवृद्धांपासून ते लहान मुलांना चॉकलेट खाण्याचा प्रचंड मोह असतो. पण चॉकलेट खाल्यानंतर होणाऱ्या समस्यामुळे अनेक जण चॉकलेट खाणे टाळतात. पण चॉकलेटवर केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की,मोनोपॉजनंतर महिलांनी सकाळी उठल्यावर चॉकलेटचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्यांना शुगर लेवल कंन्ट्रोल करण्यास तसेच वजन कमी करण्यास लाभदायक ठरु शकते.हावर्ड मधील मान्यताप्राप्त Brigham and Women’s Hospital मधील प्रोफेसर फ्रेंक ए.जे.एल शीर आणि मारता गेरालेट यांनी केलेल्या संशोधनानुसार चॉकलेट खाल्याने महिलांना फायदा होऊ शकतो असे म्हंटले आहे. तसेच हा आभ्यास त्यांनी FASEB Journal मध्ये प्रकाशित केला आहे.

संशोधनकर्त्यांनी स्पेन मधील एका महाविद्यालयासोबत मिळून मोनोपॉज असणाऱ्या 19 महिलांना सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत तसेच संध्याकाळी झोपण्यापुर्वी 100 ग्राम मिल्क चॉकलेट खाण्यास सांगितले. यानंतर त्यांच्या निष्कर्षास आले की सकाळी आणि रात्री चॉकलेट खाल्याने भूक आणि डाएट,माइक्रोबायोटा कंपोजिशन, झोपेवर याचा सकारात्मक परिणाम झालेला आढळून आला

तसेच या संशोधनानुसार दररोज सकाळी थोड्या प्रमाणात मिल्क चॉकलेटचं सेवन केल्यास वजन कमी करण्यास तसेच ब्लड शूगरलेवल कंन्ट्रोल करण्यास लाभदायक ठरते. तसेच कोणत्याही व्यक्तीने ज्या चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण ७० टक्के आहे, असे चॉकलेट थोड्या प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते, असा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे आता चॉकलेटप्रेमींसाठी ही खूप आनंदाची बाब ठरली आहे.


हे हि वाचा – मुलींना कमी वयात पीरियड्स आल्याने उंची खुंटते का?

First Published on: August 4, 2021 3:28 PM
Exit mobile version