Tuesday, May 14, 2024
घरमानिनीBeautyपावसाळ्यात ओल्या केसांवर चुकूनही करु नका 'या' गोष्टींचा वापर

पावसाळ्यात ओल्या केसांवर चुकूनही करु नका ‘या’ गोष्टींचा वापर

Subscribe

आपल्या सर्वांना माहिती आहे की, सुंदर केस प्रत्येकालाच आवडतात. त्यासाठी आपण विविध हेअर ट्रिटमेंट सुद्धा करतो. पण सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच काहींना केसगळतीची समस्या उद्भवू लागते. मात्र केस गळतीपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये काही प्रोडक्ट्स ही मिळतात. परंतु खरंतर पावसाळ्यात केसांना काही प्रोडक्ट्स लावणे नुकसानदायक ठरू शकते. (hair care in monsoon)

- Advertisement -

-पावसाच्या पाण्यात भिजू नका
पावसाळ्यात भिजणे आपल्या सर्वांना आवडते. मात्र पावसाच्या पाण्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होऊ शकतो. अशातच जर केस पावसाच्या पाण्यामुळे भिजले असतील तर नारळाच्या तेलाने केसांना आणि स्कॅल्पला मसाज करा. मसाज करण्यासाठी तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करू शकता. व्यवस्थितीत मसाज केल्यानंतर 2-3 तासांनी आपल्या केसांना शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने स्वच्छ धुवा. असे केल्याने केस गळतीची समस्या कमी होईल.

-पावसाळ्यात केसांना ब्लो ड्राय करणे
बहुतांशवेळा आपण घाईघाईत केसांना ब्लो ड्राय करतो. मात्र हेअर ड्रायरच्या मदतीने केस सुकवल्याने काही नुकसान पोहचू शकते. त्यामुळे केसांना ब्लो ड्राय केल्याने स्लॅल्पमध्ये सीबम वाढले जाते. स्कॅल्पमधून अत्याधिक तेल बाहेर येऊ लागते. त्यामुळेच आपले केस चिकट दिसून येतात.

- Advertisement -

– ओल्या केसांवर फणी फिरवल्यास होईल नुकसान
काही वेळेस आपला अत्याधिक वेळ तयारी करण्यातच जातो. अशातच आपण ओल्या केसांवर फणी फिरवतो. मात्र असे केल्याने केस डॅमेज होऊ शकतात आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते. यासाठी केसांना तुम्ही आधी टॉवेलने हलके पुसून घ्या आणि नंतर फणीने केस विंचरू शकता.


हेही वाचा- हेअर सायकलिंग म्हणजे काय

- Advertisment -

Manini