घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवसेना नाशिकच्या वतीने अभिनव स्पर्धा; रील्सच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर

शिवसेना नाशिकच्या वतीने अभिनव स्पर्धा; रील्सच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर

Subscribe

नाशिक : पारंपरिक माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच आधुनिक युगातील रिल्सचा वापर करुन प्रभावी जनजागृती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दृष्य स्वरुपात दिसू शकेल, या भावनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना नाशिकच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती तसेच मराठी अस्मितेचा जागर व्हावा, आपल्या शहराचे ज्ञात-अज्ञात पैलू लोकांसमोर यावेत, कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि यानिमित्ताने प्रत्येकात दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने शिवसेना नाशिकच्या वतीने रील्स सुपरस्टार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, आयटी सेल जिल्हाप्रमुख नितीन देशमुख उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल तसेच पारितोषिक वितरण १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना सचिव, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

रील्स सुपरस्टार स्पर्धेचे विषय 

१) हम हिंदुस्थानी : देशभक्तीपर रिल्स
२) जय जय महाराष्ट्र माझा : मराठी अस्मिता, मराठी परंपरा, मराठमोळी वेशभूषा, मराठी खाद्यसंस्कृती दाखवणारे रील्स
३) कलर्स ऑफ नाशिक : नाशिक पर्यटन, निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळे, संस्कृती वैभव, स्वच्छ नाशिक संकल्पना इत्यादींवर आधारित रील्स.
४) आई पण भारी देवा : मुलांनी आईसोबत किंवा आईने मुलांसोबत तसेच परिवारासोबत बनवलेले रील्स
५) असा मी आसामी : सोलो डान्स, सिंगिंग, वक्तृत्व इतर कलाविष्कार

- Advertisement -

रील्स सुपरस्टार स्पर्धेचे अटी व नियम 

१) प्रत्येक स्पर्धकाने वरील विषयांपैकी कुठल्याही एक किंवा एकापेक्षा अधिक विषयांवर प्रत्येकी एकच व्हिडिओ पाठवावा
२) रील्स व्हिडिओ हा किमान ३० सेकंद व कमाल ९० सेकंदाचा असावा.
३) कुणाच्याही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे, कॉपी राईट्सचे हनन होणार नाही याची काळजी घ्यावी.
४) कोणत्याही समाज किंवा जातीधर्माच्या भावना दुखावल्या जातील, असे व्हिडिओ बनवू नयेत.
५) स्वतःच्या किंवा इतरांच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रील्स शूट करू नयेत.
6) आपल्या व्हिडिओजवर शिवसेना रील्स सुपरस्टार असा वॉटरमार्क टाकावा. तसेच, रील्सच्या शेवटाची 10 सेकंदांची शिवसेना रील्स सुपरस्टार क्लीप जोडावी. ही क्लिप 9529413833 या क्रमांकावर विनंती केल्यास पाठवली जाईल.

विजेत्यांसाठीचे निकष

१) रील्स व्हिडिओ स्वत:चे, कल्पक व नाविन्यपूर्ण असावेत.
२) त्यात माहिती मूल्य असावे.
३) सुयोग्य संगीत किंवा इफेक्ट्सचा वापर केलेला असावा.
4) व्ह्यूव्ज आणि लाईक्सची संख्या अधिक असावी

- Advertisement -

अशी आहेत बक्षिसे

प्रथम पारितोषिक : सॅमसंग मोबाईल (२)
व्दितीय पारितोषिक : नॉईज कॅन्सलिंग इअरबड्स (४)
तृतीय पारितोषिक : स्मार्ट वॉच (६)

येथे पाठवा रील्स

स्पर्धकांनी आपले रील्स व्हिडिओ 9529413833 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर १२ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावेत. त्यानंतर येणार्‍या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. नाशिक शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे रील्स अपलोड केले जातील. ज्या रील्सला सर्वाधिक लाईक्स आणि व्ह्यूज असतील त्यांचा बक्षीस देताना प्राधान्याने विचार केला जाईल. अर्थात, रील्समधून दिला गेलेला संदेश व एकूणच दर्जा यालाही महत्त्व असेल.

महत्वाची टीप : देश, झेंडा, राष्ट्रगीत, राष्ट्र प्रतिके यांचा अनादर होणार नाही याची प्रत्येकाने कटाक्षाने काळजी घ्यावी. आक्षेपार्ह काही असल्यास आयोजक, संयोजक त्यासाठी जबाबदार राहणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -