डोकेदुखीची ‘ही’ असू शकतात कारणे

डोकेदुखीची ‘ही’ असू शकतात कारणे

डोकेदुखीही एक सामान्य समस्या आहे. जी कोणालाही होऊ शकते. परंतु त्याची तीव्रता प्रत्येक वेगवेगळी असू शकते. डोकेदुखीचे काही प्रकार असू शकतात. ज्यामध्ये स्ट्रेस, माइग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि साइनस डोकेदुखीचा समावेश आहे. प्रत्येकाची आपली लक्षणे आणि कारणे असू शकतात. वारंवार होणारी डोकेदुखी सामान्य आहे आणि यामागे काही कारणे असू शकतात. तर कधीकधी होणारी डोकेदुखी सामान्य मानली जाते.

परंतु हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते की, डोकेदुखीची नक्की कारणे काय असू शकतात. यावरुन तुम्ही समजून घेतले पाहिजे की, वारंवार होणाऱ्या डोकेदुखीपासून कोणते उपाय केले पाहिजेत.

डोकेदुखी काही कारणांमुळे होऊ शकते. मात्र पुढील काही कारणे मुख्य मानली जातात.
माइग्रेन
अशा प्रकारच्या स्थितीत चेहरा आणि मान फार दुखते. त्याचसोबत यावेळी मळमळ आणि अंधुकही दिसते.

क्लस्टर
यामध्ये डोक्याच्या एका बाजूला आणि डोळ्यांजवळ दुखते. या दुखण्यात तुमचे नाक वाहू लागते. अशातच कधीकधी डोळे एकाबाजूने लाल होऊ शकतात.

साइनस
साइनस झाल्यास डोकेदुखी, कपाळ, डोळे आणि कान दुखू लागतात. काही लोकांना नाक गळणे, खाज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, ताप येणे अशी समस्या होऊ शकते.

तणाव
तणावामुळे डोळ्यांच्या वर दुखणे सुरु होते. डोकेदुखी दोन्ही बाजूने होऊ लागते.

डोकेदुखीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी करा हे उपाय
-भरपूर पाणी प्या
-अत्याधिक अल्कोहोलचे सेवन करणे टाळा
-पुरेशी झोप घ्या
-कपाळाला पुदीन्याचे तेल लावू शकता
-बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन
-कॅफेनयुक्त चहा किंवा कॉफी प्या


हेही वाचा- तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे वाढतो पीरियड बॅक पेन

First Published on: October 30, 2023 12:45 PM
Exit mobile version