Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthतणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे वाढतो पीरियड बॅक पेन

तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे वाढतो पीरियड बॅक पेन

Subscribe

पीरियड्स दरम्यान लोअर बॅक पेन होणे सामान्य बाब आहे. दीर्घकाळापासून घरगुती उपायांनी याच्या दुखण्यापासून दूर राहता येऊ शकते. मात्र गॅस्ट्रिक समस्या सुद्धा याचे कारण ठरू शकते. त्यामुळे भूक न लागणे, तळमळ होणे अशा समस्या ही होऊ शकतात. खरंतर बहुतांश लोकांना अद्याप पीरियड साइकल दरम्यान होणाऱ्या दुखीची कारणे माहिती नसतात. परंतु याची नक्की कारणे काय आहेत आणि यापासून कसे दूर राहू शकता याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

हेल्थ एक्सपर्ट्स असे मानतात की, डिसमिनोरिया म्हणजेच पीरियड्समध्ये होणारा असाहय्य त्रास काही कारणांमुळे वाढू शकतो. त्यानुसार डोमेट्रियोसिस, फाइब्रॉइड गर्भाशय, पेल्विक संक्रमण म्हणजेच पीआईडी आणि एसटीआय हे पीरिड्स मध्ये होणाऱ्या भयंकर दुखण्याचे कारण असू शकते.

- Advertisement -

कारणे काय आहेत?
-फाइब्रॉइड
-पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज
-एडिनोमायोसिस

‘या’ टिप्सच्या मदतीने पीरियड बॅक पेनपासून दूर राहू शकता
-हिट थेरेपी
मसल्सला रिलॅक्स ठेवण्यासाठी तुम्ही हिट थेरेपीची मदत घेऊ शकता. यासाठी हॉट वॉटर बॉल किंवा हिटिंग पॅडचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त हॉट शॉवर बाथ स्नायूं आखडण्याच्या स्थितीला दूर करतात. पीरियड्सच्या दरम्यान हिट थेरेपीच्या मदतीने पीरियड बॅक पेनच्या समस्येपासून दूर राहू शकता.

- Advertisement -

-शारीरिक हालचाल महत्त्वाची
शरीराची हालचाल झाल्यास दुखणे कमी होऊ शकते. अशातच तुम्ही अॅक्टिव्ह राहणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते आणि दुखण्यापासून आराम मिळतो. त्याचसोबत मसल्समध्ये होणारा स्टिफनेसही दूर होतो. तुम्ही सकाळी थोडावेळ मॉडरेट एक्सरसाइजच्या मदतीने या समस्येपासून दूर राहू शकता.

-पुरेशी झोप
आठ ते दहा तासांची झोप घेतल्यास लोअर बॅक पेनच्या समस्येपासून दूर राहता येऊ शकते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पीरियड्सच्या दरम्यान शरीरात निर्माण होणारा स्टिफनेस दूर करण्यास ही झोप तुमची मदत करू शकते. ज्या महिला पुरेशी झोप घेत नाही त्यांच्यामध्ये तणावाची स्थिती यादरम्यान निर्माण होऊ शकते.

-तणावापासून दूर रहा
शरीराला रिलॅक्स ठेवण्यासाठी स्वत:साठी वेळ काढा. त्याचसोबत हलका व्यायाम कराय यामुळे पीरियड्समध्ये लोअर बॅक पेनच्या समस्येपासून आराम मिळेल. यासाठी दिवसभरात थोडावेळ मेडिटेशन, योगा किंवा डीप ब्रिदिंग एक्सरसाइज करू शकता. यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होऊ शकते. अशातच तुम्ही मानसिक रुपात स्ट्राँन्ग होता.


हेही वाचा- गर्भधारणा रोखण्याचा ‘हा’ युनिक उपाय माहितेय का?

- Advertisment -

Manini