Makar Sankranti 2021 : तिळगूळ खा निरोगी रहा!

Makar Sankranti 2021 : तिळगूळ खा निरोगी रहा!

तिळगूळ खा निरोगी रहा!

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’, असं सांगणार सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला तिळगुळाचे सेवन केले जाते. पण, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आणि त्यातील आहाराला शास्त्रीय महत्त्व आहे. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रातीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे. कारण तीळ हा उष्ण असून तो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. तिळाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता टिकवण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया. तिळगूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

उष्णता टिकून राहते

उष्णता टिकवून ठेवण्यास तिळाचे सेवन करावे. एक चमचा तीळ खाऊन त्यावर गरम पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते.

त्वचा मुलायम होते

तिळामध्ये तेलाचा समावेश असल्याने त्वचा मुलायम होते. तिळात असलेल्या तेलाने त्वचेची कांती सुधारते. त्वचा कोरडी पडू नये, याकरता थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

निरोगी हृदयासाठी

तिळामध्ये अस्तित्वात असलेले पौषक तत्व कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम इत्यादी हृदयासाठी फायदेशीर ठरतात. तसेच जेवण तयार करताना तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत होते.

रक्तस्त्राव कमी होतो

थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून तयार केलेली तिळाच्या चटणीचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळीत महिलांना कमी रक्तस्त्राव होतो.

बाळंत स्त्रीला अधिक दूध येते

बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास त्या व्यक्तीने तिळाचे सेवन करावे. दुधात तीळ घालून त्याचे सेवन केल्याने बाळंत स्त्रीला दूध येण्यास मदत होते.


हेही वाचा – प्रेग्नंसीमध्ये आहार कसा असावा?


First Published on: January 11, 2021 7:05 PM
Exit mobile version