फायदेशीर अंजीर

फायदेशीर अंजीर

उंबरासारखे दिसणारे अंजीर हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. अंजीर हे ताजे आणि सुके दोन प्रकारात बाजारात उपलब्ध असतात. अंजीरपासून अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, अंजीरमध्ये पाणी 80%, कॅल्शियम घटक 0.06%, कार्बोहायड्रेट 63%, फायबर 2.3%, प्रोटीन 3.5%, क्षार 0.7%, सोडियम, पोटॅशियम, तांब, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात.

आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही त्रास, दुखणं सतावत असते. दिवसभर कम्युटर, लॅपटॉपसमोर बसल्याने, चूकीच्या पद्धतीने आहारात पदार्थांचा समावेश केल्याने, अपुर्‍या झोपेमुळे कंबरेचे, पायाचे दुखणे वाढते. तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिल्यास अनेक दुखण्यांपासून आराम मिळू शकतो. आजकाल अनेक लहान आजार आबालवृद्धांमध्ये आढळतात.  अशा दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करणं फायदेशीर ठरतं

हे आहेत अंजीर खाण्याचे फायदे

First Published on: June 28, 2019 6:00 AM
Exit mobile version