Health Tips : कोरोना काळात ‘Work From Home’ मुळे पाठीचं दुखणं वाढलंय?,मग करा ‘हा’ उपाय

Health Tips : कोरोना काळात ‘Work From Home’ मुळे पाठीचं दुखणं वाढलंय?,मग करा ‘हा’ उपाय

Health Tips : कोरोना काळात 'Work From Home' मुळे पाठीचं दुखणं वाढलंय?,मग करा 'हा' उपाय

गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद असल्याने अनेक कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र हेच नुकसान भरुन काढण्यासाठी कंपन्यानी पर्याय म्हणून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करणे सक्तीचे केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, निर्बंध शिथिल करण्यात आले.परंतु कोरोनाचे कहर पुन्हा एकदा सुरु झाले असून, अनेक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॅपटॉपवर तासन्-तास बसून घरातून काम करण्याची वेळ आली आहे. घरुन काम करण्यासाठी अनेकांना जशा मानसिक समस्या निर्माण होत आहेत,त्याचप्रमाणे शारिरीक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. अनेकांना घरी बसून, काम करण्यासाठी योग्य जागा नसते. ज्यामुळे पाठदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खुर्चीवर किंवा पलंगावर बसून बराच वेळ काम केल्यास पाठदुखी आणि खांदेदुखीचा त्रास वाढतो. त्याचबरोबर आजकालच्या जीवनशैलीमुळे पाठदुखीचा त्रासाबरोबरच वजन वाढणे,हाडे दुखणे असे अनेक त्रास सुरु होत आहेत. मात्र, काही घरगुती उपायांनी तुमची या शारीरिक त्रासातून मुक्तता होऊ शकते.

आहारात लसूण आणि आल्याचा वापर करा.

आले,लसूण खूप फायदेशीर आहे. आले आणि लसूण खाल्ल्याने खोकला, सर्दी, गॅस, श्वास आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. पाठदुखीवरही आले लसूण खूप फायदेशीर आहे. गरम तेलात लसूण टाकून तेलाने मसाज करू शकता.

एरंडेल तेलाचा काढा 

आयुर्वेदामध्ये बद्धकोष्ठता देखील पाठदुखीचे कारण मानले गेले आहे आणि बद्धकोष्ठतेच्या बाबतीत एरंडेल तेल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्री गहू पाण्यात भिजवून सकाळी खसखस ​​आणि धण्यासह दूध मिसळून प्या. आठवड्यातून किमान 2 वेळा ते प्या. यामुळे बद्धकोष्ठता आणि पाठदुखीवर आराम मिळेल.

मोहरी आणि मेथीच्या तेलाने मसाज करा

जर तुम्हाला पाठदुखी जास्त वाटत असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे टाकून ते गरम करून घ्या. यामुळे तुम्हाला दुखण्यात त्वरित आराम मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तिळाच्या तेलाने मसाजही करू शकता.

योगा आणि व्यायाम करा

नियमितपणे योगा आणि व्यायाम केल्याने सर्व आजार दूर राहतात. तुमच्या शरीरात कुठेही वेदना होत असतील तर त्या शरीराच्या भागाचा नियमानुसार व्यायाम करावा. यामुळे दुखण्यापासून खूप आराम मिळेल. पाठदुखीसाठी रोज मकरासन करा.

आसनाची पद्धती व्यवस्थित असणे गरजेचे

पाठदुखी टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आसनाची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या पद्धतींनी पाठदुखीमध्ये आराम मिळू शकतो, त्यामुळे तुमच्या बसण्याच्या, उभे राहण्याच्या किंवा चालण्याच्या स्थितीची काळजी घ्या. एका जागी जास्त वेळ बसू नका.


हेही वाचा – Ajwain kadha- ओव्याचा काढा प्यायल्याने सर्दी खोकलाच नाही तर सांधेदुखीही होईल दूर


 

First Published on: January 11, 2022 9:33 PM
Exit mobile version