शरीरात Estrogen हार्मोनचे प्रमाण वाढलयं? मग हे पदार्थ खाऊ नका

शरीरात Estrogen हार्मोनचे प्रमाण वाढलयं? मग हे पदार्थ खाऊ नका

एस्ट्रोजेन एक प्रकारचे सेक्स हार्मोन असते, जे महिलांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी फार गरजेचे असल्याचे मानले जाते. पीरियड्स दरम्यान महिलांमध्ये या हार्मोन्समध्ये बदल होत राहतो आणि मेनोपॉज दरम्यान याचा स्तर कमी होतो. महिलांच्या स्तनांचा विकास आणि अन्य शारिरीक बदलावांसाठी एस्ट्रोजन हार्मोन (Estrogen Harmone) फार महत्वपूर्ण भुमिका बजावतो. यामुळेच याला ‘फिमेल हार्मोन’ असे ही म्हटले जाते. पुरुषांच्या शरिरात सुद्धा एस्ट्रोजन हार्मोन काही प्रकारे काम करतो. परंतु जेव्हा शरिरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर सामान्य स्तरापेक्षा अधिक होतो तेव्हा काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

महिलांच्या शरिरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर वाढल्यास कॅन्सर, एंडोमेट्रियोसिस आणि पीसीओएसची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त शरिरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर वाढल्यास वेळेवर पीरियड्स न येणे, लो सेक्स ड्राइव, केस गळती आणि माइग्रेनची समस्या उद्भवू शकते. अशातच शरिरात एस्ट्रोजे हार्मोनचा स्तर नियंत्रत राहण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल करा. जर तुमच्या शरिरात सुद्धा एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर अधिक असेल तर पुढील काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

-रेड आणि प्रोसेस्ड फूड
अशा प्रकारचे पदार्थ खाण्याने शरिरात एस्ट्रोजनचा स्तर अधिक वाढू शकतो. खासकरुन महिलांच्या शरिरात. शरिरात एस्ट्रोजनचा स्तर वाढल्यास तुम्ही याचे सेवन कराल तर यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक वाढला जाईल. अशातच तुम्ही प्लांट बेस्ड डाएटचे सेवन करा. प्लांट बेस्ड डाएटचे सेवन केल्याने शरिरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर नियंत्रित राहतो.

-रिफाइंड शुगर आणि कार्बोहाइड्रेट
या दोन्ही गोष्टी सर्व प्रकारच्या आजारांचे मुख्य कारण आहे. पॅक्ड फूड्स मध्ये सुदअधा या दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे ब्लड शुगर लेवल आणि हार्मोन्सचा स्तर बदलतो. अशातच शरिरात एस्ट्रोजनचा स्तर नियंत्रित करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही फायबर युक्त गोष्टींचे सेवन करा.

-डेयरी प्रोडक्ट्स
पशूंपासून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा एस्ट्रोजन असते. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही मर्यादित प्रमाणातच दूध किंवा त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. बहुतांश लोक डेयरी प्रोडक्ट्स आणि रेड मीट खातात आणि यामुळे वजन वाढू लागते. एस्ट्रोजनचा स्तर ही वाढला जातो. यामुळे गरेजेचे आहे की तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि वजन कमी करण्याचा ही प्रयत्न केला पाहिजे.

-मिठाई
अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने हर्मोन्स बदलतात. साखरेच्या अधिक सेवनाने फॅट सेल्स वाढू लागतात आणि तुमच्या शरिरात एस्ट्रोजनचा स्तर वाढतो. जर तुमच्या शरिरात एस्ट्रोजनचा स्तर अधिक वाढला असेल तर तुम्ही लो फॅट पदार्थांचे सेवन करा.

-दारु आणि कॉफी
लिवरच्या मदतीनेच एस्ट्रोजनचे चयापचय आणि त्याला फिल्टर केले जाते. जेव्हा लिवरची कार्यक्षमता कमी होते तेव्हा शरिरात एस्ट्रोजनचा स्तर वाढू शकतो. तर ज्या पुरुषांच्या शरिरात एस्ट्रोजनचा स्तर अधिक असेल आणि दारु पित असाल तर त्यांच्या शरिरात टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होऊ लागतो. यामुळे काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यानेही शरिरात एस्ट्रोजनचा स्तर वाढू लागतो आणि हार्मोन असंतुलित होतात.


हेही वाचा- पीरियड्स दरम्यान ‘हे’ फूड्स खाणे टाळा

First Published on: May 29, 2023 2:54 PM
Exit mobile version