Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthपीरियड्स दरम्यान 'हे' फूड्स खाणे टाळा

पीरियड्स दरम्यान ‘हे’ फूड्स खाणे टाळा

Subscribe

पीरियड्स वेळी बहुतांश महिलांना पोटात दुखणे, पाठ दुखणे आणि थकवा जाणवे अशा समस्या येतात. तसेच मूड ही स्विंग्स होतात. अशातच पीरियड्स वेळी अंग दुखत असल्याने जेवण करणे ही स्किप केले जाते. त्यामुळे शरीरात उर्जा नसल्यासारखे जाणवते. पीरियड्स वेळी सर्व गोष्टी सामान्य असतात. परंतु आपल्या लाइफस्टाइलला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही हेल्दी फूड खाल्ले पाहिजे. परंतु पीरियड्सवेळी काही फूड्स खाणे टाळले पाहिजे.

-आंबट फळं

- Advertisement -


पीरियड्स दरम्यान संत्र, मोसंबी, लिंबू अशी आंबट फळांचे सेवन करु नये. या फळांच्या सेवनाने पीरियड्स पेन वाढण्याची शक्यता असते.

-थंड पदार्थांचे सेवन

- Advertisement -


महिलांनी खास वेळी दही, आईस्क्रिम, रायता किंवा छासपासून तयार करण्यात आलेले प्रोडक्ट्स खाणे टाळावे. असे केल्याने समस्या अधिक वाढू शकते.

-गोड खाणं टाळा


पीरियड्स दरम्यान महिलांना गोड खावे असे वाटत राहते. तुम्हाला सुद्धा तसे वाटत असेल तर पेट्री, मिठाई ऐवजी सफरचंद, डाळींब याचे सेवन करु शकता. असे केल्याने शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढते. या व्यतिरिक्त मूड स्विंग्स आणि चिडचिडेपणा कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट सुद्धा खाऊ शकता.

-चहा किंवा कॉफी पिणे टाळा


पीरियड्स दरम्यान कॅफेनचे अधिक सेवन करण्यापासून दूर रहा. दुखण्यापासून दूर राहण्यासाठी संपूर्ण दिवसभरात 2-3 वेळा आलं आणि तुळसीपासू तयार केलेली चहा पिऊ शकता.

-बेक केलेले फूड्स


बेक केलेले फूड्सची टेस्ट उत्तम असते. परंतु त्यात अधिक ट्रांस फॅट ही असते. याचे सेवन केल्याने तुमच्या शरिरात एस्ट्रोजेनचा स्तर वाढू शकतो आणि यामुळे युट्रसमध्ये दुखणे वाढू शकते.


हेही वाचा- चाळीशीनंतर प्रत्येक महिलेच्या शरीरात होतात हे बदल

- Advertisment -

Manini