लघवी करताना समस्या येत असेल तर ‘ही’ असू शकतात कारणं

लघवी करताना समस्या येत असेल तर ‘ही’ असू शकतात कारणं

लघवी करताना काही लोकांना खुप दुखते किंवा त्या ठिकाणी जळजळ होते. यामागे काही कारणं असू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे युटीआय. अन्य काही इंफेक्शन्सच्या कारणास्तव ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या महिला आणि पुरुष अशी दोघांना ही होण्याची शक्यता असते. परंतु महिलांमध्ये ही सामान्य आहे. काही वेळेस लाज वाटते म्हणून काही महिला याकडे दुर्लक्ष करतात. अशातच लघवी करताना कोणत्या कारणांमुळे दुखू शकते याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात. (Painful urination causes)

ब्लेडर किंवा किडनी स्टोन
जेव्हा तुम्ही लघवी करता आणि त्यावेळी तुम्हाला दुखते यामागील हे सुद्धा एक कारण असू शकते. किडनी किंवा ब्लेडर मध्ये स्टोनची समस्या होणे सध्या सामान्य आहे. किडनीत झालेल्या स्टोनच्या कारणास्तव लघवी करताना समस्या येणे आणि याच कारणास्तव लघवी करताना दुखते.

सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन
लघवी करताना जळजवळ होणे याचे सुद्धा हे एक कारण असू शकते. अनप्रोडेक्टेड सेक्सच्या कारणास्तव हे इंफेक्शन होऊ शकते. याची लक्षणे वेळीच ओळखली तर इंफेक्शन पासून दूर राहता येऊ शकते. वजाइनात खाज आणि डिस्चार्ज हे सुद्धा त्याचे लक्षणं असू शकतात.

युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन
युटीआय ही महिलांमध्ये होणारी सर्वाधिक सामान्य समस्या आहे. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी होणे किंवा रात्रीच्या वेळेस लघवी करण्याची अधिक इच्छा होणे, लघवी करताना रक्त पडणे हे सर्व युटीआयची लक्षणं आहेत. युरिनरी ट्रॅक्ट मधील अवयवात जेव्हा बॅक्टेरियाचे संक्रमण होते तेव्हा हे इंफेक्शन होते. हे इंफेक्शन औषधांच्या मदतीने बरे केले जाऊ शकते. पण हाइजीनची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

किडनी इंफेक्शन
लघवी करताना जर तुम्हाल खुप दुखत असेल तर किडनी इंफेक्शन सुद्धा यामागील एक कारणं असू शकतेय किडनी इंफेक्शन व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं असू शकतात. त्यापैकीच हे एक आहे. किडनी इंफेक्शनवर वेळीच उपचार केले नाहीत तर मोठी समस्या उद्भवू शकते.


हेही वाचा- तुमच्या युरिनचा रंग सांगेल तुम्ही दररोज किती पाणी प्यावे

First Published on: May 29, 2023 5:58 PM
Exit mobile version