Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthतुमच्या युरिनचा रंग सांगेल तुम्ही दररोज किती पाणी प्यावे

तुमच्या युरिनचा रंग सांगेल तुम्ही दररोज किती पाणी प्यावे

Subscribe

हेल्दी आरोग्यासाठी तुम्ही दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. पाणी प्यायल्याने शरिरातील सर्व टॉक्सिक पदार्थ सहज शरिरातून बाहेर पडतात. परंतु बहुतांश लोक या बद्दल कंफ्युज असतात की, एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे. याच बद्दल हेल्थ एक्सपर्ट असे म्हणतात की, तुम्ही दररोज तुमच्या युरिनच्या रंगानुसार पाण्याचे सेवन केले पाहिजे. (Water intake in body)

हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, पाणी तुमच्या शरिरासाठी आणि त्वचेसासाठी फार फायदेशीर असते. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आपल्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी प्यायले पाहिजे. खुप प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्हाला ब्लोटिंग, वारंवार लघवी होणे, सूज येणे आणि मेटाबॉलिज्म संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

- Advertisement -

तर तुम्ही दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यावे हे सुद्धा ऋतूवर निर्भर असते. उन्हाळ्या दरम्यान घाम फार येत असल्याने शरिराला पाण्याची फार गरज असते. जेणेकरुन डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहता येईल.अशातच तुम्ही किती पाणी प्यावे हे काही गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, ऋतू, फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि शरिराची क्षमता.

त्याचसोबत हे सुद्धा महत्वाचे आहे की, आपल्या युरिनच्या रंगाकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. युरिनचा रंग पिवळा दिसत नसेल आणि त्याला दुर्गंधी येत नसेल तर समजून जा तुमच्या शरिरात पुरेशा प्रमणात पाणी आहे. अशातच तुमच्या युरिनचा रंगा अधिक पिवळसर असेल आणि अधिक दुर्गंधी येत असेल तर तुम्हाला अधिक प्रमणात पाणी पिण्याची गरज आहे. तुम्ही दिवसभरात तेवढेच पाणी प्यावे ज्यामुळे युरिनचा रंग आणि पिवळसर रंग दिसून येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा- उभं राहून पाणी पिणे म्हणजे ‘या’ आजारांचा धोका

- Advertisment -

Manini