मेनोपॉजनंतर महिलांमध्ये वाढतो हृदयविकार

मेनोपॉजनंतर महिलांमध्ये वाढतो हृदयविकार

पीरियड्स, प्रीमेनोपॉज आणि मेनोपॉज दरम्यान महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदलामुळे त्यांच्यामध्ये हृदयासंबंधिक समस्यांचा धोका वाढला जातो. मात्र सध्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हृदयासंबंधित आजार हे कमी वयातील लोकांना सुद्धा होऊ लागले आहेत. या स्थितीत मेनोपॉजनंतर हृदयरोगाचा धोका अधिक वाढला जातो. अखेर असे का होते याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

मेनोपॉज, महिलांमध्ये होणारा नैसर्गिक बदल असून जो सर्वसामान्यपणे वयाच्या चाळीशी ते पन्नास वयाच्या सुरुवातीला होतो. या स्थितीत महत्त्वाचे हार्मोनल बदल ट्रिगर होतात. विशेष रुपात एस्ट्रोजनचा स्तर कमी होऊ लागतो. एस्ट्रोजन, केवळ प्रजननाचीच भुमिका निभावत नाही तर हृदयाचे आरोग्य हेल्दी राखण्याचे ही काम करते.

का वाढला जातो हृदयासंबंधित धोका?
-कोलेस्ट्रॉल वाढणे
-ब्लड प्रेशर
-धुम्रपान आणि दारूचे सेवन

मेनोपॉजनंतर असे राखा हृदयाचे आरोग्य
मेनोपॉज दरम्यान हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी सॅच्युरेटेड आणि ट्रांस फॅट, अतिरिक्त शुगर आणि सोडियमचे सेवन कमी करावे. त्याऐवजी फळ, लीन प्रोटीन आणि कमी फॅट असणारे डेअरी प्रोडक्ट्स खावेत. जेणेकरुन हृदयाचे आरोग्य राखले जाईल.

या व्यतिरिक्त आठवड्यातून पाच दिवस तरी कमीत की 30 मिनिटे व्यायाम करावा. जेणेकरुन वजन नियंत्रणात राहीलच पण ब्लड प्रेशर ही कमी होईल.


हेही वाचा- तणावाचा पीरियड्सवर होतो परिणाम, असे रहा दूर

First Published on: September 29, 2023 11:38 AM
Exit mobile version