उष्माघात व उपाययोजना – भाग २

उष्माघात व उपाययोजना – भाग २

Sun Stroke

प्रतिबंधात्मक उपाय

हे करावे
♦ वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
♦ कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत.
♦ उष्णता शोषून घेणारे पण काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढर्‍या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
♦ जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे (तहान लागली नसेल तरीही).
♦ सरबत प्यावे, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
♦ अधूनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
♦ वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व डॉक्टर्सच्या सल्ल्याने उपचार सुरू करावा.
♦ उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा.
♦ घरे थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर, यांचा वापर करण्यात यावा, तसेच वाळ्याचे किंवा सुती ओले पडदे व सनसेडचा वापर करावा. रात्री खिडक्या, झरोके उघड्या ठेवण्यात याव्यात.
♦ कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास सावली करून थेट सूर्यप्रकाशाचा संबंध टाळावा.
♦ कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शक्य असल्यास माठ वापरावा.
♦ गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार असलेले कामगार यांची जास्त काळजी घेण्यात यावी.

हे करू नये
♦ लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तसेच दारे, खिडक्या बंद करून ठेवू नये.
♦ दुपारी १२ ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात जाणे, काम करणे टाळावे.
♦ गडद रंगाचे, घट्ट, जाड कपडे घालण्याचे टाळावे.
♦ तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

उपचार
♦ रुग्णास वातानुकूलित खोलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत.
♦ रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
♦ रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
♦ रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत.
♦ आवश्यकतेनुसार सलाईन देणे.

First Published on: April 11, 2019 4:05 AM
Exit mobile version