डायपरमुळे बाळाला येणारे रॅशेश असे करा दूर

डायपरमुळे बाळाला येणारे रॅशेश असे करा दूर

डायपरमुळे बाळाला येणारे रॅशेश असे करा दूर

लहान बाळांची त्वचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते. ज्यावेळी बाळाला डायपर घातले जाते त्यावेळी बाळाला लाल रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे अशा अनेक समस्या उद्भवतात. यामुळे बाळ नेहमीच अस्वस्थ रहाते. बाळाचे नितंब, मांडी आणि गुप्तांगांची त्वचा लाल आणि सुजलेली दिसते. त्याठिकाणी बाळाला स्पर्श जरी केला तरी बाळाला ते असह्य होते आणि बाळ रडू लागते. अशावेळी काही घरगुती उपायांचा वापर केल्यास बाळाच्या वेदना कमी होतात.

खोबरेल तेल

बाळाच्या त्वचेवर डायपरचे रॅश आल्यास त्या जागी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करु शकता. खोबरेल तेलाने अलगद मसाज करावा. यामुळे बाळाला आराम पडतो आणि वेदना देखील कमी होतात.

दूध

डायपरमुळे येणारा पुरळ तुम्ही दुधाने सहजरित्या दूर करु शकता. बऱ्याचदा पुरळ येऊन बाळाची त्वचा सुजते, अशावेळी त्याठिकाणी दुधामध्ये स्वच्छ कपडा बुडवून पुरळ आलेल्या भागावर ठेवावा. यामुळे थंडावा मिळतो आणि सूज देखील कमी होते.

दही

डायपरच्या रॅशेशवर दही एक उत्तम पर्याय आहे. दह्याचा तुम्ही क्रीम म्हणून देखील वापर करु शकता.

व्हॅसलिन जेल

डायपरमुळे त्वचा लालसर होते, अशावेळी त्याठिकाणी व्हॅसलिन जेल लावावे, यामुळे चांगला फायदा होतो.

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती असून त्वचेच्या कोणत्याही समस्येकरता कोरफड एक रामबाण उपाय आहे. ज्याठिकाणी जळजळ किंवा पुरळ आला असले त्याठिकाणी कोरफड लावावे. यामुळे त्याचा चांगला फायदा होतो.

First Published on: December 10, 2020 6:56 AM
Exit mobile version