उन्हाळ्यातील फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपाय

उन्हाळ्यातील फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना फंगल इंन्फेक्शनची समस्या उद्भवते. अनेकदा फंगल इंन्फेक्शन उपचार केल्यानंतर लगेच बरे होते. परंतु काहीवेळेस हे लवकर बरे होत नाही. अशातच तुम्ही घरच्या घरी उन्हाळ्यात इंन्फेक्शनवर उपचार करु शकता.

फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपचार

जर फंगल इंन्फेक्शन झाले असेल तर अॅपल साइडर व्हिनेगरचा वापर करु शकता. फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर पिऊ शकता.


फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी टी ट्री ऑइलचा वापर करु शकता. खरंतर टी ट्री ऑळ मध्ये अँन्टीफंगल आणि अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. अशातच फंगल इंन्फेक्शनची लक्षण कमी करण्यासाठी टी ट्री ऑइल फायदेशीर ठरु शकतो. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घेत त्यात टी ट्री ऑइल टाका. हे मिश्रण फंगल इंन्फेक्शनवर लावा.


नारळाचे तेल फंगल इंन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. या तेलात अँन्टीफंगल गुण असतात. यामुळे फंगल इंन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इंन्फेक्शन दूर होऊ शकते.


कोरफड त्वचेसाठी फार उत्तम मानले जाते. यामुळे स्किन इंन्फेक्शन आणि फंगल इंन्फेक्शन दूर होऊ शकते. कोरफड मध्ये अँन्टीऑक्सिडेंट्स, अँन्टीफंगल गुण असतात. यामुळे स्किन रेडनेस, जळजळ, खाजेपासून आराम मिळतो.


कडुलिंबाच्या पानांमुळे फंगल इंन्फेक्शनची समस्या दूर होते. याच्या पानांमध्ये अँन्टीफंगल गुण असतात. त्यामुळे कडुलिंबाची पान तुम्ही उकळा आणि नंतर फंगल इंन्फेक्शन झालेल्या ठिकाणी त्या पाण्याने पुसून घ्या.


हेही वाचा : थकवा दूर करण्यासाठी ऊसाचा रस पिणं फायदेशीर

First Published on: March 20, 2024 5:00 PM
Exit mobile version