Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthथकवा दूर करण्यासाठी ऊसाचा रस पिणं फायदेशीर

थकवा दूर करण्यासाठी ऊसाचा रस पिणं फायदेशीर

Subscribe

उन्हाळाच्या दिवसात ऊसाचा रस पिणे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर असते. कारण या रसामध्ये व्हिटामिन ए,बी, सी असे पोषक घटक असतात. याशिवाय या रसात मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमही हे घटकही मोठ्याप्रमाणात आढळतात. त्यामुळे शरारीस उपयुक्त असे सर्व घटक ऊसामध्ये मिळतात. उसाचा रस पोटासाठी देखील अतिशय प्रभावी मानला जातो. विशेष म्हणजे या रसाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास अधिक मदत होते. ऊसाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच इतर आजारांवरही रामबाण उपाय मानला जातो.

ऊसाचा रस पिण्याचे फायदे

Benefits Of Sugarcane Juice – The Ultimate Summer Quencher

- Advertisement -
  • ऊसाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग कमी होतात. तसेच शरारीत रक्त शुद्ध होते.
  • उसामध्ये सुक्रोजचे प्रमाण असल्याने शरीरावरील जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • उन्हाळात तीव्र सुर्यप्रकाशामुळे सतत घाम येत असल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते. यावेळी ऊसाचा रसाचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील मरगळ दूर होते.
  • लघवी करताना बर्‍याच लोकांना वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवते. अशा लोकांनी उसाचा रस प्यावा.
  • ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह आणि पोटॅशियम असल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते.

3,000+ Free Sugarcane Juice & Juice Images - Pixabay

  • ऊसामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते.
  • ऊसाच्या रसात अल्कधर्मीचे प्रमाण जास्त असल्याने रोज रसाचे सेवन केल्यास स्तन, पोट आणि फुफ्फुसांचा कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहता येते.
  • ऊसाचा रसाचे सेवनामुळे आपल्या शरीरात ग्लूकोजचे प्रमाण संतुलन राहते ज्यामुळे मधुमेह आजाराचा धोका कमी होतो.
  • त्यामुळे नैसर्गिकरित्या गोड असणारा ऊसाचा रस मधुमेहाचे रुग्ण देखील पिऊ शकतात.
  • गरोदरपणात थकवा आणि इतर आजार टाळण्यासाठी ऊसाचा रस खूप फायदेशीर ठरतो.

हेही वाचा :

फ्रोझन फूडमुळे कॅन्सर, मधुमेहाचा धोका

- Advertisment -

Manini