थायरॉइड आहे, काळजी नसावी

थायरॉइड आहे, काळजी नसावी

हायपोथायरॉयडिसम म्हणजे थायरॉइड नावाच्या ग्रंथीतून स्रवणाऱ्या हार्मोनची पातळी कमी होणे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड होतो असे मानले जाते. पण व्यतिरिक्तसुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइड बळावतो. गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या या ग्रंथीतून निघणारे हे हार्मोन शरीरातल्या सर्व पेशींचे कार्य सुरळीत रितीने चालणे आवश्यक असते. या हार्मोन्सच्या होणाऱ्या कमतरतेमुळे होणारा त्रास आणि त्यांची लक्षणं वेळेत समजली तर त्यावर उपाययोजना करणे शक्य असते. वेळेत लक्षणं ध्यानात आली तर थायरॉइड असणारा रूग्ण पुर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे थायरॉइड असल्यास कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.

जराशी काळजी आणि नियमित तपासणी हे दोन उपाय केल्यास थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळता येणे शक्य असते. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक प्रमाणात होतो, असे देखील सांगितले जाते.

ही आहेत थायरॉइडची लक्षणे

थायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे आदी प्रमुख लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच शरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ ही लक्षणे थायरॉइडची असू शकतात. या विकाराची पडताळणी करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करण्यात येतात.

हे करा घरगुती उपाय

First Published on: December 3, 2019 6:30 AM
Exit mobile version