‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता

कढीपत्त्याचे 'औषधी' फायदे

आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो. प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे जेवण रुचकर लागते. मात्र, हा कढीपत्ता जीभेचे चोचले पुरवणारा असला तरी त्याचे खास असे आरोग्यदायी गुणधर्म खूप आहेत. चला तर जाणून घेऊया ‘औषधी’ कढीपत्ता

जुलाब लागले असता

कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की, ‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.

पचनास चांगली मदत

ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो. जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो. त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.

तारुण्य टिकून राहते

नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

मधुमेह

मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

कोलेस्टेरॉल

कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.

पांढरे केस

कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. पांढरे केस काळे होण्यास मदत होते. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

कर्करोग

कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, च्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. शा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.

सर्दी-खोकला

सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

यकृताचे आजार

यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

अंगावर सारखे करट उठणे

अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

पित्ताची उलटी

पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

डोळ्यांचे विकार कमी होतात.

कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांचे विकार कमी होतात.

First Published on: December 11, 2019 6:30 AM
Exit mobile version