कापराचे औषधी गुणधर्म

कापराचे औषधी गुणधर्म

फोटो प्रातिनिधिक आहे

 

कापूर हा आपल्या देवघरात सहज आढळून येतो. मात्र हा कापूर देवपूजेकरता मर्यादीत राहिलेला नसून त्याचे इतर औषधी फायदे देखील तितकेच आहेत. ते आपण पाहणार आहोत.
एखाद्या ठिकाणी भाजले असल्यास त्या ठिकाणी जळजळ होण्यास सुरुवात होते. अशावेळी त्या ठिकाणी कापूर किंवा कापराचे तेल लावावे यांने त्वरित आराम मिळतो.

उलटी होत असल्यास पुदीन्याच्या रसात थोडासा कापूर विरघळून त्याचे काही थेंब पिल्याने उलटी होणे थांबते.

सर्दी झाली असल्यास रुमालात कापूर बांधून तो हुंगल्यास आराम मिळतो

तोंड आले असल्यास तोंडात कापूर घोळवावा

दात दुखत असल्यास त्या जागी कापराची पावडर ठेवावी यामुळे दात दुखी थांबते

कफ झाला असल्यास ओवा गरम करुन घ्यावा. हा ओवा एका रुमालात घेऊन त्यासोबत कापराची वडी घेऊन त्याची गुंडाळी करुन हुंगावे. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते.

पोटदुखी होत असल्यास ओवा, पुदीना आणि त्यात कापराचे काही थेंब टाकून त्याचे सेवन केल्यास पोटदुखी थांबते

स्नायू आणि सांधे दुखत असल्यास त्यावर कापराचे तेल लावल्यास सांधे दुखी थांबते

(टीप : हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे)

First Published on: June 24, 2018 2:02 PM
Exit mobile version