उन्हाळ्यात ‘थंडा थंडा – कुल कुल’

उन्हाळ्यात ‘थंडा थंडा – कुल कुल’

उन्हाळ्यात या पेयांचे करा सेवन

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार देखील उद्भवतात. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणाऱ्या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. अशावेळी थंड पेयाचे सेवन करावेसे वाटते. मात्र बंद पॅकेटमधील पेय शरिरास घातक ठरतात. मात्र घरच्याघरी तयार करण्यात आलेले सेवन नेहमीच शरिरास उत्तम. अशीच काही खास घरगुती पेय पाहणार आहोत.

लिंबू सरबत

लिंबू सरबत हे घरच्या घरी तयार करता येणार पेय असून यामुळे भूक देखील वाढते. तसेच हे पचण्यास पाचक असे पेय आहे.

कोकम सरबत

अॅसिडीटीवर कोकम सरबत हा एक रामबाण उपाय असून हे पेय घरच्या घरी बनवून ठेवता देखील येत.

आवळा सरबत

आवळा सरबत हे वात, पित्त, कफ कमी करणारे पेय असून हे थंड पेय शरिरास लाभदायक ठरत.

कैरीचे पन्हे

उन्हाळ्यात कैऱ्या मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात. त्यामुळे घरच्याघरी कैरीचे पन्हे तयार करता येते. कैरीचे पन्हे वाढविणारे असले तरी देखील ते चवदार असून कधीतरी पिण्यास योग्य असे आहे.

नारळाचे पाणी

गोड, थंड, पचायला हलके, भूक वाढविणारे, तहान शमविणारे, शरीराला ताकद देणारे आणि लघवीला साफ करणाऱ्या नारळाच्या पाण्याचे उन्हाळ्यात सेवन करावे.

ताक

दह्यापासून ताक बनवणे अगदी सोपे असून त्यात थोडीशी जिरेपूड घालावी, यामुळे जेवण देखील चांगले पचते.

ऊसाचा रस

गोड, पित्त – वात कमी करणारे पेय.

मनुकांचे पेय

मनुका गरम पाण्यात भिजवून काही काळ ठेवून नंतर कुस्करुन गाळून ते पाणी प्यावे. यामुळे थकवा, चक्कर, शरीराची आग कमी होण्यास मदत होते.

धण्याचे पाणी

उन्हाळ्यात मूतखड्याचा त्रास अधिक चाळवतो. अशावेळी एक ग्लास पाण्यात १ चमचा धणे आणि १ चमचा ओवा रात्री कोमट पाण्यात भिजवून सकाळी वस्त्रगाळ करुन ते पाणी सलग २१ दिवस प्यायल्यास मूतखड्याचा त्रास कमी होतो.


वाचा – उन्हाळा आला आरोग्य सांभाळा


 

First Published on: March 28, 2019 3:42 PM
Exit mobile version