बाप्पासाठी खास तयार करा काजूचे मोदक

बाप्पासाठी खास तयार करा काजूचे मोदक

बाप्पासाठी खास तयार करा काजूचे मोदक

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या शनिवारी २२ तारखेला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. कोरोनाचा काळ असला तरी साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आज आपण खास बाप्पासाठी घराच्या घरी काजूचे मोदक कसे तयार करतात हे पाहणार आहोत.

साहित्य

अर्धी वाटी किसलेले ओले खोबरे, दोन वाटी कणिक दुधात भिजवून घेतलेल, १० किंवा गरजेनुसार काजूचे बारीक तुकडे, अर्धी वाटी पिठी साखर, दोन वेलचीची पूड, अर्धी वाटी तूप किंवा तेल

कृती

पहिल्यांदा ओले खोबरे, काजूचे तुकडे, पीठी साखर आणि वेलची पूड एकत्र करून सारण तयार करून घ्यायचे. त्यानंतर भिजवलेला कणकेचे २१ छोटे गोळे करून घ्यायचे. मग एक गोळा घेऊ तो लाटून त्यामध्ये तयार केलेले सारण भरायचे. मग मोदकाचा आकार तयार करू तो तूपात किंवा तेलात तळायचा. मग थोड्यावेळाने रंग बदलला की तो काढून घ्या. अशा सोप्या पद्धतीने घराच्या घरी तयार करा काजूचे मोदक.

First Published on: August 17, 2020 6:00 AM
Exit mobile version