डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर उपाय

डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर उपाय

डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर उपाय

बऱ्याचदा चेहरा गोरा असला तरी देखील डोळ्याखालील डार्क सर्कल्समुळे सौंदर्यात बादा येते. कारण चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांमध्येच दडलेले असते. मात्र, तुम्हाला जर डार्क सर्कल्सपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय केल्यास तुमची ही समस्या नक्की दूर होण्यास मदत होईल.

बदाम

१ चमचा बदाम पेस्ट आणि दूध यांचे एकत्रित मिश्रण डोळ्यांखाली लावले तर डोळ्याखालील काळपटपणा दूर होतो आणि चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

काकडी

काकडी शरीरासाठी थंड असते. तसेच ती डोळ्यांसाठी देखील लाभदायक ठरते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन २० मिनिटे डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात.

बटाटा

बटाट्याचे छोटे स्लाईस किंवा कच्च्या बटाट्याचा रससुद्धा डोळ्याभोवती लावल्यास त्याचाही अधिक चांगला फायदा होतो.

लिंबाचा रस

लिंबाचा रस आणि काकडीचा रस एकत्र करुन डोळ्याखालील भागाला १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर दूर होऊन तुमचे डोळे अधिकच आकर्षित दिसण्यास मदत होईल.

टोमॅटो

टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करुन डोळ्यांभोवती लावल्यास काळपटपणा दूर होतो. तसेच टोमॅटोमुळे चेहऱ्याचा ग्लोसुद्धा वाढतो.

First Published on: March 1, 2020 6:00 AM
Exit mobile version