Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthउत्तम आरोग्यासाठी आहारात घ्या फायबर युक्त पदार्थ

उत्तम आरोग्यासाठी आहारात घ्या फायबर युक्त पदार्थ

Subscribe

अलीकडच्या धावपळीच्या जगात कुटुंबापासून दूर असलेल्या अनेकांना घरचं पौष्टिक जेवण खायला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते फास्ट फूडचा पर्याय निवडतात. कमी वेळात उपलब्ध होणारे फास्टफूड अर्थात जंकफूड खाण्यामध्ये फारसे पोषक घटक नसतात. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक म्हणजेच फायबर युक्त घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारातून व्हायला हवा. फायबरयुक्त घटक पचनक्रिया मजबूत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यास, आपण फायबर युक्त आहार घेणं आवश्यक आहे. आहारात फायबरयुक्त असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश केल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवत नाहीत.

आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

30 High Fiber Foods

- Advertisement -
  • फायबरयुक्त डाएटमध्ये तुम्ही आहारात कॉर्न, मक्का खायला हवा. यामध्ये सुमारे 4 टक्के फायबर असते.
  • डाळी, रजमा आणि छोले यासारख्या गोष्टींचा समावेश आहारात केला पाहिजे. हा फायबरचा चांगला स्रोत आहे. कोंब फुटलेल्या कडधान्यातून जास्त फायबर मिळण्यास मदत होते.
  • सर्व फळांमध्ये फायबर हा घटक असतो. मात्र, पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याशिवाय सफरचंद आणि नासपती देखील फायबरयुक्त असतात.

The 12 Best Vegetables High in Fiber

  • गव्हापासून बनवलेल्या ब्राऊन ब्रेडमध्ये फायबरचा चांगला स्रोत आहे. ब्रेकफास्टसाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड खाऊ शकता.
  • ड्रायफ्रुट्स खाल्याने देखील आरोग्यास फायबर मिळण्यास मदत होईल.
  • ओट्समध्ये फायबर भरपूर असतात. नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करणे आवश्यक आहे. ओट्समध्ये बीटा ग्लूकन नावाचा एक विशेष प्रकारचा फायबर असतो. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे लेवल कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते.

हेही वाचा :

उन्हाळा सुरू होताच बाळाची घ्या विशेष काळजी

- Advertisment -

Manini