घरमहाराष्ट्रJarange VS Fadnavis : मनोज जरांगेंनंतर देवेंद्र फडणवीसही मुंबईच्या दिशेने रवाना

Jarange VS Fadnavis : मनोज जरांगेंनंतर देवेंद्र फडणवीसही मुंबईच्या दिशेने रवाना

Subscribe

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. मी पायी चालत सागर बंगल्यावर जाणार आहे. तिथे माझा एन्काऊंटर करा, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. यानंतर आता सातारा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (Jarange VS Fadnavis After Manoj Jarange Devendra Fadnavis also left for Mumbai)

हेही वाचा – Bacchu Kadu : एका व्यक्तीवरील आरोपाने आंदोलनाची दिशा…; बच्चू कडूंकडून जरांगेंना विनंती

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे आज नियोजित सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. तसंच, आज भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली असता, मी पाहिलं नाही तर मी कशाला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांना दुसऱ्यांदा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर आता फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाणा झाले आहेत. फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील हे सुद्धा सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी माध्यमांशी बोलतानाच माईक ठेवला आणि उठून सागर बंगल्याकडे जायला निघाले. यावेळी मराठी बांधवांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटील कोणचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. मात्र, आंतरवाली सराटीमधील ग्रामस्थ त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा रुग्णालयामध्ये जाऊ, त्यानंतर निर्णय घेता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र मनोज जरांगे पाटील फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कोणतेही उपचार न घेता येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी

मनोज जरांगे फडणवीसांवर गंभीर आरोप

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सरकारला शिव्या दिल्या त्याचा त्यांना राग आहे. त्यामुळे मला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे-जे त्यांच्याविरोधात गेले त्यांना ते संपवत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी पाहिजे असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो. तिथे माझा बळी घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो. ते माझं उपोषण सोडायला येणार होते, मात्र मी त्यांना येऊ दिले नाही, याचा त्यांना राग आहे. ते माझ्याविरोधात ब्राम्हणी कावा रचत आहेत. पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -