Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReturn Wedding Gifts : लग्नात गिफ्ट द्यायचंय? हे आहेत बेस्ट ऑप्शन

Return Wedding Gifts : लग्नात गिफ्ट द्यायचंय? हे आहेत बेस्ट ऑप्शन

Subscribe

लग्नसमारंभात गिफ्ट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. लग्नात जर तुम्ही अगदी आवडीने एखादं गिफ्ट दिलंत आणि ते समोरच्याला आवडलं नाहीतर काय उपयोग? त्यामुळे जर शक्य असेल तर समोरच्याची आवड-निवड लक्षात घेऊन गिफ्ट द्या. पण त्या वेळी लग्नात गिफ्ट काय द्यायचे, असे एक ना अनेक प्रश्न पडतात. मात्र, आता काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला काही गिफ्ट आयडियाज सांगणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या खास व्यक्तींना देऊ शकता.

कस्टमाइज्ड गिफ्ट्स (Customized Gifts)

कस्टमाइज्ड गिफ्टबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच. यामध्ये ही बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत. कुशन कव्हर्स,  फोटो फ्रेम, बेडशीट्स, टीशर्ट्स सेट्स इ. आणि यात तुम्ही या गोष्टींवर जोडप्याचे सुंदर फोटोज छापून गिफ्ट्स कस्टमाईज करू शकता.

- Advertisement -

मॅचिंग घड्याळ (WATCH)

घड्याळ वेळ पाहण्यासाठी उपयुक्त आहे आणि एखाद्या प्रिय व्यक्तीला घड्याळ भेट देणे हे शुभ शगुन मानले जाते. तुम्ही नवविवाहित जोडप्याला मॅचिंग घड्याळांचा सेट देऊ शकता. हे घड्याळ पाहून ते तुमची आठवण काढतील.

कॅश (Cash)

कॅश म्हणजे रोख रूपये गिफ्ट म्हणून देणे हे सर्वात जुनं आणि चांगलं गिफ्ट आहे. जोडप्याची आवडनिवड माहीत नसल्यास कॅश दिल्याने त्यांना स्वतःच्या आवडीनुसार वस्तू घेता येतात. तुम्हीही आपल्या बजेटनुसार नवविवाहीत जोडप्याला कॅश देऊ शकता.

- Advertisement -

फोटो फ्रेम्स (Photo Frames)

फोटो फ्रेम्समुळे घराच्या भिंती नेहमीच सुंदर दिसतात. आजकाल तर फोटोफ्रेम्स वेगवेगळ्या डिझाईन्स आणि प्रकारात उपलब्ध आहेत. जसं वॉल डेकोरेशन फोटो फ्रेम्स, मॅग्नेटीक फोटो फ्रेम्स, डिजीटल फोटो फ्रेम्स इ. तुम्ही त्या जोडप्याच्या फोटोची फ्रेम करून देऊ शकता किंवा नुसती फ्रेमही गिफ्ट म्हणून देता येऊ शकते. जर तुमची थोडं बजेट वाढवायची तयारी असल्यास डिजीटल फोटो फ्रेमही जोडप्याला देऊ शकता. ज्यामध्ये अनेक फोटो आणि व्हीडीओ स्टोर करून ते पाहता येतात.

मिठाई किंवा सुक्या मेव्याचे पॅकेट (sweets or dry fruits)

अनेकजण गिफ्ट म्हणून मिठाई किंवा सुक्या मेव्याची पाकिटेही नातेवाईकांना देतात. अनेकांना गिफ्ट म्हणून मिठाई किंवा सुका मेवा द्यायला आवडतो. बजेटमध्ये ही खूप चांगली भेट ठरू शकते.

________________________________________________________________________

हेही वाचा : Relationship Tips : जोडीदाराशी सतत वाद होतात? फॉलो करा या टिप्स

- Advertisment -

Manini