घरमुंबईMumbai News : मिठी नदीच्या कामाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना; पालिकेसह एमएमआरडीए रडारवर

Mumbai News : मिठी नदीच्या कामाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना; पालिकेसह एमएमआरडीए रडारवर

Subscribe

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच तिच्या अन्य कामांसाठी जवळपास 1300 कोटींहून अधिकचा खर्च झाल्याचा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर आता कथित खर्चाच्या चौकशीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच तिच्या अन्य कामांसाठी जवळपास 1300 कोटींहून अधिकचा खर्च झाल्याचा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केला होता. यानंतर आता कथित खर्चाच्या चौकशीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने 20 एसआयटीची स्थापना केली आहे. (SIT set up to probe Mithi river work Municipality or MMRDA on radar)

26 जुलै 2005 रोजी मुंबईत पूरस्थिती निर्माण होवून झालेल्या मोठ्या जिवीत व वित्तीय हानीला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची विकासकामे 19 वर्षे उलटली तरी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. याचपार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत 2005 ते 2022 दरम्यान मिठीचा गाळ काढण्यासाठी 1300 कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच 1997 ते 2022 या काळात शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या पालिकेने केलेल्या कामाच्या चौकशीचीही मागणी केली होती. याचपार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कथित कोविड केंद्र, बॉडी बॅग, खिचडी घोटाळा यासह नागरी करारांपैकी अनियमिततेची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेली ही आतापर्यंतची सहावी एसआयटी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तयार करण्यात आलेल्या एसआयटीचे नेतृत्व आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त करणार आहेत. त्यात उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, निरीक्षकांसह 20 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मिठीचा गाळ, कंत्राटदार, कथित खर्चातील अनियमिततेची एसटीमार्फत चौकशी होणार आहे. तसेच मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 2005 पासून पालिकेने केलेल्या खर्चाचा लेखाजोखा तपासण्यात येणार आहे. यामध्ये मिठी नदीचा काही भाग पालिका तर काही भाग एमएमआरडीएच्या अंतर्गत येतो. त्यामुळे या दोघांचीही चौकशी होणार आहे.

- Advertisement -

मिठी नदीची विकासकामे अद्यापही पूर्ण नाहीत (The development work of Mithi river is still not complete)

दरम्यान, 26 जुलै 2005 च्या प्रलंयकारी पावसात पूरस्थितीसाठी कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची विकासकामे 19 वर्षे उलटली तरी अद्यापही पूर्ण होत नाहीत. मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेकडून 2005 चा पूरस्थितीनंतर प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे हाती घेण्यात आली. याचपार्श्वभूमीवर मागील महिन्यात 29 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पालिकेने मिठी नदीच्या रुंदीकरणात बाधक ठरलेल्या 672 झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामे हटविण्याची धडक कार्यवाही केली. त्यामुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी 40 मीटरवरून 100 मीटरवर नेण्यास मदत होणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : नकली शिवसेना.. नकली राष्ट्रवादी, अमित शहांच्या टीकेवर जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -