Saturday, May 4, 2024
घरमानिनीFashionbanarasi Silk saree-रॉयल लूक देणाऱ्या बनारसी साडीचा ट्रेंड

banarasi Silk saree-रॉयल लूक देणाऱ्या बनारसी साडीचा ट्रेंड

Subscribe

ह्ल्ली लग्न समारंभ असो की सणवार अथवा पार्टी, महिलांची पहीली पसंती असते ती बनारसी साडी. यामुळे बनारसी साडी ट्रेंडमध्ये आहे. विेशेष म्हणजे बनारसी साडी रॉयल लूक तर देतेच शिवाय त्यातील बारीक नक्षीकामामुळे या साडीला पारंपरिक महत्वही प्राप्त झाले आहे.

बॉलीवूडपासून बिजनेस क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सेलिब्रिटीजनाही या बनारसी साडीने भुरळ घातली आहे. यामुळे अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री आपल्याला बनारसी साडीत वावरताना दिसतात. एवढच नाही तर उद्योगसम्राट मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलाही अनेक समारंभात बनारसी नेसून वावरताना दिसताना. एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने निळ्या रंगाची बनारसी साडी नेसली होती. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

- Advertisement -

जर तुम्हालाही असेल रॉयल दिसायच असेल तर बनारसी साडीमध्ये रॉयल लुक येण्यासाठी तुम्ही ऑरेंज बनारसी साडी जरूर ट्राय करा. अभिनेत्री ईशा गुप्ताने अशा प्रकारची साडी नेसली आहे. अभिनेत्रीने केशरी रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे. या साडीत अभिनेत्री रॉयल दिसत होती. तुम्हाला या प्रकारची साडी बाजारातून सहज मिळेल आणि तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

हेही पहा :

बनारसी साडीची वैशिष्टे

बनारसी साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर जरीचे काम आहे. पूर्वीच्या काळी जरीचे काम सोन्याच्या किंवा चांदीच्या तारांनी केले जात असे. साधारणपणे बनारसी साडीच्या पल्लू किंवा बॉर्डरवर चांदी किंवा सोन्याच्या तारेने केलेले जरीचे काम आढळून आले. मात्र, आधुनिकता, वाढती महागाई आणि ग्राहकांच्या मागणीमुळे आता या बनारसी सिल्क साडीवर जरीचे काम सोन्याच्या किंवा चांदीच्या तारांनी न करता सामान्य धातूच्या तारांनी केले जाते

- Advertisement -

या साडीसोबत गोल्डन कलरच्या नेकपीससोबत मॅचिंग ज्वेलरी घालू शकता. यासोबतच तुम्ही फूटवेअरमद्ये हील्स किंवा शूज घालू शकता.


 

Edited By

Aarya Joshi

- Advertisment -

Manini