घरठाणेSuburban Local : पहिल्या रेल्वेला १७१ वर्ष पूर्ण ; लोकल प्रवाशांच्या...

Suburban Local : पहिल्या रेल्वेला १७१ वर्ष पूर्ण ; लोकल प्रवाशांच्या नशिबी घुसमट, गर्दी, जीवघेणा प्रवास कायम

Subscribe

ठाणे : अमोल कदम 
ब्रिटिश काळात ठाणे ते बोरीबंदर अशी पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. या रेल्वेला १६ एप्रिल २०२४ रोजी १७१ वर्ष पूर्ण होतील. केंद्र सरकारला सर्वात जास्त निधी मुंबई रेल्वे डिव्हिजन कडून मिळत आहे. यामध्ये सर्वात जास्त नफा मुंबई, उपनगर ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकलसेवेमुळे होत आहे. पण रेल्वेला इतके वर्ष उलटूनही लोकल प्रवाशांच्या नशिबी गर्दी, घुसमट आणि जीवघेणा अपघात कायम असल्याने प्रवासी रेल्वे सेवेवर संताप व्यक्त करत आहेत. देशाच्या रेल्वे मंत्री यांनी रेल्वे लोकल सेवा सुधारण्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक होते. पण मुंबई डीआरएम ह्यांच्या दुर्लक्षतेमुळे आजही मुंबई उपनगर येथील प्रवाशांचा गर्दीतून घुसमट होऊन जीवघेणा प्रवास होत आहे. यामुळे लोकल प्रवाशांचा प्रवास सुखमय होईल का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

ठाणे ते बोरीबंदर अशी १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. त्या काळातील रेल्वेचे इंजिन ठाणे स्थानकात ठेवण्यात आले हे इंजिन बार्शी लाईट झुक, झुक आगीनगाडीचे असून हे स्थानकातील एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला ठेवण्यात आले असून चारही बाजूने लोखंडी ग्रिल सुरक्षा म्हणून लावण्यात आली आहे. या इंजिन पासून पाहिल्या रेल्वेची आठवण आताच्या युवा पिढीला होईल याकरिता स्थानीक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवासी संघटना यांनी रेल्वेकडे मागणी केली होती, त्या नुसार हे रेल्वे इंजिन काही वर्षापासून ठाणे स्थानकात ठेवण्यात आले आहे. या इंजिनच्या बाजूला रेल्वेने आकर्षक विद्युत रोषणाई करणे आवश्यक आहे. पण रेल्वेचे इलेक्ट्रिक विभाग निविदा कोण काढणार? याकडे लक्ष ठेऊन आहे.

- Advertisement -

हेही वाचा –Indian Railway: ऐकावं ते नवलच, क्रिकेट सामन्यामुळे झाला ‘तो’ अपघात, रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं कारण
यंदाचा १७१ वा पाहिल्या रेल्वेचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहाने या इंजिनच्या आवाराच्या परिसरात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे हे इंजिन युवा पिढीला माहिती देणारे होईल असे फलक देखील या परिसरात रेल्वे विभागाने लावणे आवश्यक आहे.
पहिली रेल्वे सुरु झल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढलेला आहे, ठाण्यापासून देशभरात रेल्वे लाईन जोडल्या गेल्या असून देशभरातील नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहेत. रेल्वे प्रशासनाला सर्वात जास्त फायदा उपनगरीय लोकल मधून होत असून सुद्धा लोकल प्रवाशांच्या नशिबी गर्दी आणि अपघाताचा प्रवास असल्याचे प्रवासी सांगत आहेत. सकाळ आणि संध्याकाळ पिकअवर्स वेळी लोकलमधून घुसमटत गर्दीतून प्रवास करावा लागत आहे, प्रवास करताना कार्यालयात जाताना, कार्यालयातून घरी जाताना तसेच इतर ठिकाणी कार्यक्रमाला जाताना लोकल प्रवाशांना  गर्दीमुळे प्रवाशांमध्ये एकमेकाविरोधात चिडचिड निर्माण होते. यामुळे पुरुष तसेच महिला प्रवाशांची धक्का लागण्यावरून दररोज वाद निर्माण होऊन भांडणे देखील होत आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे १६ एप्रिल रोजी रेल्वेला १७१ वर्ष पूर्ण होतील आता तरी रेल्वे प्रशासन लोकल प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, ह्याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न सर्व सामान्य रेल्वे प्रवाशांना पडला आहे.
” साहेबांची पोर कसे नकली रे, बिन बैलाची गाडी कशी हाकली रे”, ब्रिटिशकालीन पहिली लोकल धावली, त्यावेळी भारतीय नागरीकांचे पहिल्या रेल्वेच्या वेळी काढलेले उद्गार असे असल्याचे रेल्वे अभ्यासक सांगत आहेत.

हेही वाचा-Central Railway : मध्य रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळाले ‘एवढे’ उत्पन्न; वाचा सविस्तर

- Advertisement -

सीएमएमटी ते डोंबिवली लोकल वाढवा, सीएमएमटी – कर्जत, सीएमएमटी-कसारा लोकल कल्याण पर्यंत करून कल्याण- सीएसएमटी अशा लोकल सुरु करून लोकलची संख्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवाशांची संख्या वाढतच आहे गर्दी देखील वाढतच राहणार आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूने समांतर रस्ते देखील होणे आवश्यक आहे.

– डॉ.  दत्तात्रय गोडबोले, रेल्वे अभ्यासक, ठाणे.

———————————————————–
प्रवाशांना पडणारे प्रश्न ? रेल्वे प्रशासन सोडवेल का?

– लोकल गर्दीवर कंट्रोल नाही.

– पीक अवर्समध्ये रेल्वे तर सोडा पण रेल्वे स्थानकावर उभे राहायला जागा नाही.

– सण उत्सव आले कि लोकल वेळेवर नाहीत मेगाब्लॉक मुळे प्रवासी हैराण.

– कल्याण ते कर्जत- कसारा लोकल प्रवाशांसाठी शटल किंवा ट्रेन सुरू करण्याची मागणी १४ वर्ष प्रलंबित असताना नवीन मेल, एक्सप्रेस गाड्या कश्या सुरू केल्या जातात.

– कुर्ला पुढे १ ते ४ ट्रॅक वर आणि ठाणे – दिवा लोकल करिता नवीन बांधलेल्या ट्रॅकवर  मेल गाड्या का? चालविल्या जातात.
– अपघात ग्रस्त स्टेशन कळवा, मुंब्रा असताना पारसिक नवीन स्टेशन का होत नाही.

– मागील १५ वर्ष पासून गुरवली रेल्वे स्टेशन उभारणीचे काम युद्ध पातळीवर का होत नाही.
– अतिरिक्त नवीन ट्रॅक ठाणे ते दिवा दरम्यान होऊन सुद्धा नवीन शटल रेल्वे सेवा का सुरू नाही.
– अति गर्दीमुळे रेल्वे मधून पडणारे आकडे वाढण्यामागे मेल आणि लोकलच्या ट्रॅक वरील अतिक्रमण कधी दूर होणार.

– सर्व सामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या कमी दराच्या वातानुकूलित लोकल करा.

– लोकल १५ डब्याच्या असून देखील महिलाकरिता डब्यांची संख्या अजून का नाही वाढवली.

– अनेक वर्ष आंदोलन करून देखील कळवा, वांगणी, टिटवाळा येथील प्रवाशांना सुविधा का नाही.
– पिकअवर्समध्ये सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत मेल, एक्सप्रेस गाड्या बंद करून लोकल गाड्याच चालवाव्या.
– प्रथम दर्जा डबामध्ये पिकवर्समध्ये बिना तिकिट प्रवासी कधी थांबणार.

– कळवा- एरोळी लिंक रोड काम कधी पूर्ण होणार.

– कल्याण रिमॉडलींन  काम युद्ध पातळीवर कधी पूर्ण होणार.
– कळवा, मुंब्रा येथील प्रवाशांना सकाळच्या वेळेत लोकलमध्ये चढता यावे, याकरिता मुंब्रा किंवा कळवा स्थानकातून नवीन लोकल सुरू करा.

– ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलची संख्या वाढवा.

– दिवा – वसई या मार्गावर सबर्मन दर्जा असून देखील लोकल सेवा सुरळीत सुरु नाही, मेमू लोकल बंद करून फ्रिक्वेंसी  वाढवा.

– गर्दी कंट्रोल करण्याकरिता ठाणे – उरण, सीएसएमटी- उरण लोकल सुरु करा.

– कल्याण ते टिटवाळा, बदलापूर स्टेशनची लांबी वाढवून १५ डब्याच्या लोकल सुरू करा.  वसई – दिवा, दिवा – पनवेल मार्गावर मेमु गाड्यांची संख्या वाढवा.
– सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा द्या.

– पनवेल- कर्जत लोकल सुरु करा.

– लोकल डब्यातील एलईडी टीव्हीवर मनोरंजन कार्यक्रम, भक्तिमय गीते लावण्यात यावी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -