International Cat Day 2020: …म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मांजर दिवस

International Cat Day 2020: …म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मांजर दिवस

International Cat Day 2020: ...म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय मांजर दिवस

दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय मांजर दिवस (International Cat Day)  साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा २००२मध्ये साजरा केला होता. जेव्हा पशु कल्याणसाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय निधाद्वारे मांजरीच्या संरक्षणाची चर्चा केली गेली. त्यावेळेस स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कल्याण निधीने ८ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मांजर दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी जगभरात मांजर दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मांजरीचे संरक्षण करणे आणि मदत करणे आहे. शिवाय माजंरीविषयी लोकांना जागरूक करणे आहे. भारतात देखील मांजर दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आज आपण मांजर दिवसाबद्दल जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवस

मांजर हे पाळीव प्राण्यांमध्ये मोडते. हा दिवस बऱ्याच देशांमध्ये जागतिक मांजर दिवस म्हणूनही ओळखला जातो. मांजर दिवस साजरा करण्याबाबत अनेक देशांमध्ये मतभेद आहे. रशियामध्ये १ मार्च रोजी मांजर दिवस साजरा केला जाते. तर अमेरिकेत २९ ऑक्टोबर रोजी मांजर दिवस साजरा केला जातो. जपानमध्ये २२ फेब्रवारीला मांजर दिवस साजरा केला जातो. या दिवश बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु सध्या कोरोना काळ असल्यामुळे घरीच मांजर दिवस साजरा केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मांजर दिवस साजरा होत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मांजरीचे व्हिडिओ आणि फोटो लोक शेअर करत आहेत.

आंतरराष्ट्रीय मांजर दिवसाचे महत्त्व

आपल्या सर्वांना माहित आहे की प्राणी बोलू शकत नाहीत. पण ते त्यांची भावना व्यक्त करू शकतात. दरम्यान मांजर खूप गोंड असतात आणि ते पाळवी प्राणी आहे. मांजरींच्या संरक्षणसाठी आणि मदतीसाठी आपण जबाबदार आहोत. आधुनिक काळात मांजर पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील सर्व प्रजातींचे संरक्षण करणे आपले मूलभूत कर्तव्य आहे.


हेही वाचा – मुसळधार पावसात मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी धडपड; सोशल मीडियावर होतंय कौतुक


 

First Published on: August 8, 2020 1:33 PM
Exit mobile version