घरमुंबईमुसळधार पावसात मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी धडपड; सोशल मीडियावर होतंय कौतुक

मुसळधार पावसात मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी धडपड; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Subscribe

सळधार पावसात स्वतःच्या जीवाची काळजी घेत या मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्यामुळे त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादान उडाली. मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील या बचावकार्यात सहभागी होऊन मदतीस उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचे सांगितले जात आहे.

या मुसळधार पावसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात असून २६ जूलैच्या पावसाची आठवण प्रत्येक मुंबईकराला कालच्या पावसाच्या दिवशी निश्चित आली असणार, अशापरिस्थिती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वडाळा येथे राहणारा एक माणूस मुसळधार पावसामुळे भरलेल्या पाण्यातून मांजरीच्या पिल्लाला वाचवत आहे. त्या व्यक्तीने आपल्या बाईकवर मांजरीचे पिल्लू अगदी सुखरूपपणे बसवून त्याला सुरक्षित ठिकाणी नेले. यावेळी पिल्लांची भिती या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

- Advertisement -

त्या व्यक्तीने असे म्हटले आहे की, तो या मांजरीचे पिल्लू आपल्या घरी घेऊन जाणार आहे. या व्हिडिओमध्ये हा माणूस लहानशा मांजरीला बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करत असून काही वेळाने ते पिल्लू शांतपणे बसलेले दिसते. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह अनेक ठिकाणी कोसळत असणाऱ्या या मुसळधार पावसाचा फटका माणसांबरोबर मुक्या प्राण्यांना देखील बसल्याचे दिसत आहे तर त्याता प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुसळधार पावसात स्वतःच्या जीवाची काळजी घेत या मुक्या प्राण्याचा जीव वाचवल्यामुळे त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे.


Rain LIVE Update: समुद्राला भरती; मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -