बाळाला काजळ लावयचं का?

बाळाला काजळ लावयचं का?

प्रत्येक भारतीय घरात नवजात बालकाला काजळ लावणे हे एका परंपरेप्रमाणे मानले जाते. वयस्कर लोक असे मानतात की, काजळ लावल्याने मुलांना नजर लागत नाही. त्याचसोबत त्यांचे डोळे मोठे होतात. परंतु तुम्ही मेडिकल आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास तर नवजात बालकाला काजळ लावल्याने काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खरंच बाळाला काजळ लावायचा का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

आजाकाल मार्केटमध्ये केमिकल युक्त काळज मिळते. ते बाळाच्या डोळ्यांना लावणे नुकसानदायक ठरु शकते. कारण लहान मुलांचे डोळे हे फार नाजूक असतात. अशातच कमिकलचा वापर केल्याने मुलांना नुकसान पोहचू शकते. तज्ञ असे सांगतात की, मुलांना काजळ लावणे अगदी सुरक्षित नाही. काजळात अधिक प्रमाणात लीड असते. जे डोळ्यांच्या वाटे शरिराच्या अन्य हिस्स्याला प्रभावित करु शकतात.

डोळ्याला काजळ लावल्याने कमेकिल कंजेक्टिवाइटिसची समस्या उद्भवू शकते. यामुळे डोळ्यांना इंफेक्शन होणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त कॉर्नियल अल्सरची सुद्धा समस्या होऊ शकते. यामध्ये डोळे लाल होण्यासह ते दुखतात. तसेच त्वचेवर इंफेक्शन होण्याचा धोका ही वाढतो.

घरी बनवलेले काजळ सुरक्षित असते का?
काही लोकांचे असे मानणे असते की, घरात नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले काजळ अगदी सुरक्षित असते. मात्र केमिकलयुक्त काजळ सेफ नाही. खरंतर लहान बाळाची त्वचा अधिक सेंसिटीव असते. त्यामुळे लहानशी चुक ही बाळाच्या आरोग्याला समस्या निर्माण करु शकते. जेव्हा तुम्ही बोटाने काजळ लावता तेव्हा इंफेक्शनचा धोका वाढतो.


हेही वाचा- आईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवीन ट्रेंड

First Published on: May 5, 2023 5:18 PM
Exit mobile version