Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchen Tips : तुमचा फ्रिज कूल होत नाही का ? 'या'...

Kitchen Tips : तुमचा फ्रिज कूल होत नाही का ? ‘या’ टिप्स करा फॉलो

Subscribe

घरच्या फ्रीजची अशा पद्धतीने काळजी घ्या. जेणेकरून फ्रीज खराब होणार नाही. तसेच फ्रीज दीर्घकाळ पर्यंत चांगला राहील.

एप्रिल मे महिन्यात उन्हाळा प्रचंड वाढत असतो आणि त्यात थंड पाणी हे आवश्यक आहे. अशातच एन उन्हळ्यात फ्रिज बंद झाला किंवा फ्रीजचा थंडपणा कमी झाला कि सर्वांचीच गैरसोय होते. अशातच १२ महिने फ्रिज घरी चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक असतो. पण, कधी- कधी फ्रिजमध्ये काही बिघाड होतो होतो आणि त्याचे कुलिंग अचानक कमी होते.
6 Reasons Why Your Refrigerator Isn't Cooling | Aviv Service Today
आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट ट्रिक्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही फ्रीजचे कुलिंग देखील वाढवू शकता.
  • फ्रिजवर कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. त्यामुळे फ्रिजचे कूलिंग कमी होण्याची शक्यता असते.
  •  फ्रिजमध्ये जास्त वस्तू ठेवल्यास फ्रिजचे कूलिंग कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तेव्हड्याच वस्तू फ्रिज मध्ये ठेवा.
Refrigerator Not Cooling? Try These 8 Easy Fixes — Advice from Bob Vila
  • फ्रिजच्या मागच्या बाजूला डबे किंवा इतर सामान ठेवू नये. तसेच कोणत्याही वस्तू मागे चिकटून ठेवल्यात तर ही कूलिंगची हवा योग्य पद्धतीने येत नाही आणि कूलिंग कमी होते. आणि यामुळे फ्रिजमध्ये वास येतो.
  •  फ्रिजचे दार सारखे उघड बंद करू नका. यामुळे फ्रिजमधील गार हवा बाहेर जाते आणि गारवा कमी होतो तसेच वस्तू खराब होण्याची शक्यता असते.
  •  फ्रिजच्या कूलिंग कमी-जास्त करण्यासाठी त्यामध्ये एक बटण दिलेले असते, त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा.
Freezer Won't Freeze Ice Cream? Fix Ice Cream Soft in Freezer
  • दर तीन दिवसांनी डिफ्रोजसाठी दिलेले बटण एकदा दाबा. त्यामुळे फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ कमी होऊन तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
  • फ्रिज भिंतीला चिकटून ठेवू कधीच ठेवू नये. त्यामुळे कॉम्प्रेसरचा आवाज येतो आणि फ्रिज खराब होण्याची शक्यता असते.
- Advertisment -

Manini