घरताज्या घडामोडीसचिन वाझेला पोलीस सेवेत पुन्हा कोणी घेतले? अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

सचिन वाझेला पोलीस सेवेत पुन्हा कोणी घेतले? अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

Subscribe

१०० कोटी वसुली प्रकरणी आरोपी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी वापरण्यात आलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव प्रामुख्याने समोर आलं होतं. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याबाबत मोठा खुलासा केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अनिल देशमुख यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले की, सचिन वाझे हे फौजदार होते. त्यांना सरकारी नोकरीत घेण्याचा अधिकार आयुक्त पातळीवरच होता. प्रत्येकाला अधिकार वाटून दिलेले असतात. एसीपीच्या खालच्या दर्जाचे अधिकारी शासकीय नोकरीत घेण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात. महाराष्ट्रात साडेसात हजार फौजदार आहेत. आयुक्तांनी कुणाला नोकरीत घेतले याची माहिती गृहमंत्र्यांना नसते, असं अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -

वाझेला नोकरीत घेतल्यानंतर माझ्या कानावर काही तक्रारीही आल्या. मी आयुक्त परमबीर सिंह यांना बोलावलं होतं. त्यांना सांगितलं होतं की, हा सचिन वाझे कोण आहे, ते मी पहिल्यांदा ऐकतो आहे त्यांना नोकरीत घेतल्याबद्दल तक्रार देखील आहे. तेव्हा परमबीर सिंह यांनी मला सांगितलं की, त्यांच्याबद्दल तक्रार असतील पण मी त्याला २५-३० वर्षांपासून ओळखतो. त्याच्याबद्दल ज्या तक्रारी आहेत त्या खोट्या आहेत. माझा तो अतिशय जवळचा असल्याने त्याची मदत होईल असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं.

मी एक उदाहरण देतो. एखादा खून होतो तेव्हा त्याबाबत नेमकी माहिती समोर यायला थोडा तरी वेळ येतो. आता मनसुख हिरेनचा ज्या दिवशी खून झाला होता त्याच दिवशी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशावेळी लगेच माहिती उपलब्ध नव्हती, अशी खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : नवी मुंबईत रबाळे एमआयडीसीमध्ये भीषण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -