झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाणी प्या

झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाणी प्या

झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाणी प्या

बऱ्याचदा रात्री झोपताना काही लोक दुधाचे सेवन करुन झोपतात. दूध हे आरोग्यास लाभदायक असले तरी रात्री झोपताना गूळ आणि त्यासोबत पाण्याचे सेवन केल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होतो. चवीला गोड असलेले गूळ आणि गरम पाण्याचे रात्री झोपताना सेवन केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

पनक्रिया सुधारते

गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच चयापचय क्रिया चांगली राहते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी आणि गूळ याचे सेवन करावे. यामुळे पोटात थंडावा वाटतो. त्याचप्रमाणे गॅसचा त्रास देखील नाहीसा होतो. ज्यांना गॅसचा त्रास आहे, त्यांनी तर हा उपाय करावा.

थकवा जाणवत असल्यास

संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी अनोश्या पोटी गूळ नक्की खावा. तसेच रात्री झोपताना गूळाचा एक खडा खाऊन त्यावर गरम पाण्याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होतो.

अन्नपचनाचा त्रास

ज्या व्यक्तींचे अन्नपचन सहज होत नाही, त्यांच्यासाठी गूळ आणि गरम पाणी एक रामबाण उपाय आहे.

आम्लपित्ताचा त्रास

खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळेस दररोज गुळाचा एक खडा खाऊन त्यावर गरम पाणी प्यावे. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

First Published on: February 20, 2020 6:45 AM
Exit mobile version