समुद्रसौंदर्याने बहरलेलं कारवार मुंबईकरांच्या भेटीला

समुद्रसौंदर्याने बहरलेलं कारवार मुंबईकरांच्या भेटीला

कारवार फुड फेस्ट

मुंबईतील अंधेरीस्थित कोहिनूर कॉंटिनेंटलमधील ‘सॉलिटेअर रेस्टॉरंट’मध्ये शुक्रवार दि. २९ मार्चपासून दहा दिवसांचा कारवारी खाद्यमहोत्सव सुरू असून, यामध्ये कारवारी मास्टरशेफ श्रीमती माधवी कामत यांच्या हातची अस्सल कारवारी चव खवय्यांना चाखायला मिळत आहे. या महोत्सवात, सुमारे ४० विविध कारवारी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.

कारवारची वैशिष्ठे

कारवार म्हटलं की आठवतो तो सुंदर समुद्रकिनारा, त्यामुळे या महोत्सवाची सजावटही सागरकिनाऱ्यावर बेतलेली आहे. समुद्र, रंगीबेरंगी मासे, वाळू, शंखशिंपले अशा वातावरणात बसून चविष्ट कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्याचा अनुभव या महोत्सवात घेता येतो. इतकंच काय, पण रेस्टॉरंटमधले वाढपे सुद्धा पारंपरिक कारवारी वेशातच पदार्थ वाढतात. महत्त्वाचं आकर्षण म्हणजे, या कारवारी खाद्य महोत्सवाला अनेक नामांकित सेलिब्रिटीही भेट देणार आहेत. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी १५० खवय्यांनी या महोत्सवास भेट देऊन विक्रमी सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भेट देणाऱ्या खवय्यांची संख्या वाढतच आहे.

कारवाची खाद्य वैशिष्ठे

कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला, विशाल सागर किनाऱ्यांनी वेढलेला, एक सुंदर टुमदार भाग म्हणजे कारवार. इथल्या समुद्राप्रमाणेच कारवारी माणसं विशाल मनाची आणि प्रेमळ म्हणून प्रसिद्ध आहेत. भात आणि मासे हे येथील मुख्य अन्न असले तरी येथील विविध प्रकारच्या करी आणि उपकरी निश्चितच चाखाव्यात अशा असतात. कारवारच्या विविधरंगी निसर्गाप्रमाणेच इथल्या भूमीत मुरलेल्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांच्या चवीही नाना प्रकारच्या मासाल्यांनी परिपूर्ण असतात. कारवारी पदार्थांची खरी ओळख म्हणजे साधे पण झणझणीत, रस्सेदार खाद्यपदार्थ. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन कधीच पूर्ण होत नाही. अशा या आगळ्यावेगळ्या कारवारी खाद्यसंस्कृतीने आजवर स्वतः चे वेगळेपण जपलेले असले तरी ती फारशी कधी प्रसिद्धीझोतात आली नाही. किंबहुना खूप लोकांना अजूनही ही खाद्यसंस्कृती परिचित नाही, आणि ज्या कारवारी खवय्यांना ती परिचित आहे त्यांना कुठेच सहज उपलब्ध होत नाही; म्हणूनच सॉलिटेअर रेस्टॉरंटने या खाद्यमहोत्सवाच्या माध्यमातून मुंबईकरांना कारवारी भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी दिली आहे.

सात एप्रिल पर्यंत फूड फेस्ट सुरु

कारवारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दि. ७ एप्रिलपर्यंत सॉलिटेअर रेस्टॉरंटमधील ‘कारवारी फूड फेस्ट’ला सहमित्रपरिवार आवर्जून भेट द्या. सॉलिटेअर हे हॉटेल कॉंटिनेंटल या फोर स्टार हॉटेलचा भाग असले तरी इथले दर माफक असल्याने खाद्यप्रेमींमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे. बुकिंगसाठी क्रमांकावर संपर्क: ०२२-३०८०६६६६, ०९३२३७८२५९७

First Published on: April 1, 2019 6:21 PM
Exit mobile version