किचन टिप्स

किचन टिप्स

वालाची उसळ

*डाळिंबीची उसळ शिजत असतानाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबी अख्ख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही. तसेच डाळिंबी शिजण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.

*सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.

*साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.

*वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.

*वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंब्या पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात. (नीट शिजत नाहीत, तर दाणे टचटचीत रहातात)

*पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लास्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेत घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.

First Published on: November 11, 2018 12:59 AM
Exit mobile version