झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स

या किचन टिप्समध्ये वेगवेगळ्या तुम्हाला थोडक्यात टिप्स दिल्या आहेत.

यामुळे पावभाजीला येतो रंग
पावभाजी करताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात बीट किसून घाला. त्यामुळे पावभाजीला छान लालसर रंग येतो.

 पावभाजीचे पाव कसे कापावेत?
पावभाजीचे पाव नीट कापण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये सुरी बुडवून ते पाव कापावेत. यामुळे पाव नीट कापले जातात.

भाज्यांचा हिरवा रंग राहण्यासाठी हे करावे.
कोणत्याही हिरव्या रंगाच्या भाज्या शिजवण्या अगोदर पाण्यात हळद, मीठ घालून शिजवावे. यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार राहतो.

यामुळे होतात अळू वड्या चुरचुरीत
अळू वड्या करताना पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. त्यानंतर पानावर थोडेसे तेल लावावे आणि त्यावरून पीठ पसरावे. यामुळे अळू वड्या चुरचुरीत होतात.

हाताला येणाऱ्या मसाल्याचा वास जाण्याकरिता…..
हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरिता त्यावर कच्चा बट्टा आणि लिंबू चोळावा.

कशा होतील पुऱ्या खुसखुशीत?
पुऱ्या खुसखुशीत करण्याकरिता पुरीचे मीठ मळताना त्यात थोडे दूध आणि बेसन घालावे.

यामुळे पालेभाज्यांमधील लोहाचे प्रमाण वाढते.
हिरव्या पालेभाज्या तयार करण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा. त्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते.

भाज्या किंवा फळे आधी कापून ठेऊन नये.
४ ते ५ तास आधीपासून भाज्या किंवा फळे कापून ठेऊ नये. त्यामुळे यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून जेव्हा भाजी करणार असाल आणि फळे खाणार असाल तेव्हाच ती कापावीत.

First Published on: November 28, 2019 6:00 AM
Exit mobile version