Footcorn : पायाला भोवरी झालीये? हे घरगुती उपाय नक्की करून बघा

Footcorn : पायाला भोवरी झालीये? हे घरगुती उपाय नक्की करून बघा

भोवरी

या फॅशनच्या जगात कपड्यांबरोबरच फुटवेअरची क्रेझही फार वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्टाईलच्या चप्पलांची, बुटांची विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. प्रत्येकाला नवीन ट्रेंड अनुसार बाजारत फुटवेअर विकले जातात. पण बाजारात मिळणारे प्रत्येक फॅशनेबल फुटवेअर आरामदायक नसतात, त्यामुळे फूटकॉर्न सारखे समस्या उद्भवतात.

फूटकॉर्नची समस्या वाढतेय

फूटकॉर्न त्वचेवर होतात. ते कडक असतात, त्याचा जाड थर तयार होतो. फूटकॉर्न पायाच्या बोटांमध्ये, अंगठ्याला किंवा तळव्याला होतात. ही एक शारीरिक समस्या आहे. यामुळे खूप वेदना होतात, चालताना देखील भयंकर त्रास होतो. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या वाढत जाते. त्यामुळे ऑपरेशनदेखील करण्याची वेळ येऊ शकते.

पायाच्या बोटांवर, तळाशी एक गोल तयार होतो. त्याच्या त्वचा लालसर होते. चालताना त्रास होतो, त्वचेवर कोरड्या मेणासारखा थर असतो. ही सर्व भोवरीची लक्षणंअसू शकतात.

ही आहेत फुटकॉर्नची कारणं

१. चुकीचे फूटवेअर घातल्यामुळे फूटकॉर्नची समस्या उद्भवते. आपल्या पायासाठी नेहमी आरामदायक पादत्रणं निवडा.

२. चपलांशिवाय खूप वेळ जमिनीवर चालण्याने पायावर दाब येतो, त्यामुळे भोवरी होते.

३. त्याचप्रमाणे लोक खूप वेळ घट्ट बूट किंवा सँडल घालतात त्यांनाही भोवरी होऊ शकते.

४. खेळाडूंना भोवरीचा त्रास मोठ्या प्रमाणावर संभवतो.

५. जे लोक सडपातळ असतात किंवा वयाच्या ५० वर्षांपेक्षा जास्त असतात त्यांना भोवरी जास्त होते.

हे आहेत उपाय

भोवरी होऊ नये म्हणून अशा चपला, बूट वापरणं बंद करा ज्याने तळव्यावर दबाव येतो. बूट घालत असाल तर मोजे जरूर वापरा त्याने वेदना होणार नाहीत. भोवरीसाठी एक्युपंक्चर उपचारांची मदत घेऊ शकता. या शिवाय होमिओपॅथिक औषधंही उपयोगी आहेत. याने भोवरी ठीक होते. त्वचेवर सूज असेल तर बर्फाने शेका त्याने सूज उतरते. शिवाय बाजारात कॉर्न प्लास्टरदेखील मिळू लागले आहेत. हे प्लास्टर गोलाकार असतात. याला भोवरीवर लावल्याने आराम मिळतो आणि हळूहळू भोवरी बरी होते.

First Published on: September 17, 2020 9:29 AM
Exit mobile version