Friday, March 1, 2024
घरमानिनीHealthस्तनपान करणाऱ्या महिलांनी आहारात करावा 'या' पदार्थांचा समावेश

स्तनपान करणाऱ्या महिलांनी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

Subscribe

आईचे दूध बाळासाठी नैसर्गिक पूर्णान्न असून स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. यामुळे जन्माला आल्यावर बाळाला सर्वात आधी आईचे दूध पाजले जाते. पण बऱ्याच महिलांना पुरेसे दूध येत नसल्याने बाळाला अर्धपोटी राहावे लागते. यामुळे बाळ भुकेने चिडचिडे होते. परंतु बाळाच्या आईने जर आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर त्यांची या समस्येतून सुटका होऊ शकते आणि बाळाला पुरेसे दूध मिळू शकते.

स्तनपान करणाऱ्या महिलांनी खा ‘हे’ पदार्थ

5 Benefits of Breastfeeding: Physicians for Women - Melius & Schurr : Obstetricians & Gynecologists

- Advertisement -
  • बदाम

बदामामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे दूध वाढते. यामुळे डिलीव्हरीनंतर दूधात बदाम टाकून ते उकळून पिल्यास दूध वाढते.

  • खजूर

खजूर खाल्ल्यानेही दूध वाढते. खजूरामध्ये प्रोलेक्टीन हार्मोन असते. यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी 8-10 खजूर रात्रभर दोन कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात . सकाळी त्यातील बी काढून उरलेला गर एक ग्लास कोमट दूधात टाकून पिल्यास दूधाची समस्या दूर होते.

- Advertisement -
  • डाळी

डाळींमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर तसेच आयर्न मुबलक प्रमाणात असते. त्यातही हिरव्या मूगडाळ पचायला हलकी आणि पौष्टीक असते. यामुळे प्रसूती झालेल्या महिलेला आवर्जून डाळ खाण्यास देतात.

How to consume Dry fruits

  • मेथी

मेथीचे दाण्यामध्ये फायटोएस्ट्रोजनचा उत्तम स्त्रोत आहे. एक चमचा मेथीचे दाणे एक कप पाण्यात उकळून गाळून घ्यावे. नंतर कोमट झाल्यावर त्यात थोडसे मध टाकून दिवसातून तीन वेळा पिल्यास फरक पडतो.

  • ओवा

अपचन झाल्यावर किंवा पोटात गॅस झाल्यावर ओव्याचे सेवन केले जाते. पण दूध यावे यासाठीही ओवा खाल्ल्यास फायदा होता. यासाठी दोन चमचा ओवा रात्रभर एक कप पाण्यात भिजवावा. सकाळी ते पाणी गाळून प्यावे.

  • जीरे

ओव्याप्रमाणेच जीऱ्याचे सेवन केल्यासही दूधाचे प्रमाण वाढते. जीरे, गुळ आणि आले एकत्र शिजवून घ्यावे. त्यामुळे दूध वाढते. ओवा आणि जिऱ्याप्रमाणेच बडीशेपही दूध वाढीसाठी उत्तम पदार्थ आहे. बडीशेपमुळे दूध वाढण्यास मदत होते.

आईच्या दूधाचा बाळाला फायदा

बाळाला संपूर्ण आहार मिळतो.
बाळामध्ये रोगप्रतिकारशक्त्ती निर्माण होते.
जबड्याच्या विकासास मदत विकास
सहज पचन होते.
शारीरिक व बौधिक विकास होते.


हेही वाचा :

जेवणावर फुंकर मारणं बाळासाठी धोक्याचं

- Advertisment -

Manini